शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

निंभोऱ्यात दोन गटात हाणामारी

By admin | Updated: April 4, 2017 23:08 IST

येथील एकाच समाजातील दोन गटात बांधकामाच्या मोजणीतील वादातून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील दहा ते बारा जण जखमी झाले.

ऑनलाइन लोकमतनिंभोरा बु.।। (ता.रावेर), दि. 04 - येथील एकाच समाजातील दोन गटात बांधकामाच्या मोजणीतील वादातून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील दहा ते बारा जण जखमी झाले. ही घटना ४ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ११.३० घडली. दरम्यान, हाणामारी प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी जुबेर खान अजिज खान (रा.मुस्लीमवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात ४ रोजी दुपारी आरोपी शेख फरीद शेख आरीफ, शेख आसिफ शेख गुलाब, शेख बालू शेख मुनीर, शेख गुलाब शेख गफूर, शेख इकबाल शेख गफूर, शेख सईद शेख गफूर, शेख रफीक शेख रशीद, शेख फिरोज शेख रफीक, शेख बशीर शेख रशीद, शेख हारुन शेख सलीम, शेख सलीम शेख मुनीर, शेख वजीर शेख गुलाब, यास्मीन बी.शेख बशीर, तैयसीम बी शे.बशीर, शमीम बी.शेख रफीक, मैयमुना बी.शेख रशीद ( रा.निंभोरा बु.।।) यांनी फिर्यादी यांचे वडील यांच्या घरासमोरील सीटीसर्व्हे ८५५ मध्ये ओटा बांधलेला आहे. त्याबाबत न्यायालयात केस चालू असल्याने कोर्टाच्या आदेशाने या ठिकाणी अ‍ॅड.युसूफ ,अ‍ॅड. गाढे मोजमाप करीत असताना यातील आरोपी शेख फरीद शेख शरीफ, शेख बालू शेख मुनीर, शेख गुलाब शेख गफूर हे वकीलांना म्हणाले की, आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा असे म्हणून आरोपी यांनी हातात काठ्या व दगड घेऊन फिर्यादी व साक्षीदारांना डोक्यावर, हातावर, पायावर व पाठीवर मारहाण केली. साक्षीदार यांना किरकोळ व गंभीर दुखापत करून शिवीगाळ दमबाजी केल्याने पोलीस ठाण्यात गुरनं. २१/२०१७ भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ३३७, ५०४, ५०६, ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात शेख बालू शेख मुनीर यांनी फिर्याद दिली असून यात ४ रोजी दुपारी ११ वाजेदरम्यान आरोपी शेख गुलाब शेख अकबर, शेख हसन शेख अकबर, शेख जावेद शेख गुलाब, शेख आसिफ शेख गुलाब, जुबेर खान अजीज खान, आयुब खाँ मेहमूद खॉ, युसूफ खान मेहमूद खान, हबीब खाँ मेहमूद खॉं, हमीद खाँ मेहमूद खाँ, अनीस खाँ हमीद खाँ, इमरान खाँ हमीद खाँ, फिरोज खाँ युसूफ खाँ, शेख पप्पू शेख हसन, सलमान खॉ अयुब खाँ, शाहरूख खाँ आयुब खाँ, शेख सांडू शेख गफूर, शेख युसूफ शेख शकृूर, आरस्तूल बी अजीज खाँ, अजीज खाँ हैदर खाँ, यासीन बी उर्फ गुड्डी बी अजीज खाँ, भुरी अजीज खाँ, अलीशान बी मर्द महेमूद खाँ, तसलीन बी.हमीद खाँ, शमीम बी.शेख हसन, खैराबी हबीब खाँ, शेख वसीम शेख बिस्मील्ला, शेख शाबीर शेख बिस्मील्ला, मोनाबी शेख जावीद, सायराबीे अय्यूब खाँ (सर्व रा.निंभोरा बु.।।) यांनी सिटी सर्वे ८५५ मध्ये मोजमाप करण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी काठ्या, दगड विटानी मारहाण केली. शिवीगाळ दमबाजी केली यावरून निंभोरा पोलीस ठाण्यात भाग पाच गुरनं. २२/२०१७ भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२६, ३२४, ३२३, ३३७, ५०४, ५०६, ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे असा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच फैजपरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम, फौजदार ज्ञानेश्वर पाकळे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोख बंदोबस्त लावण्यात आला. तपास फैजपूर उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, फौजदार पाकळे व पोलीस तपास करीत आहे. जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(वार्ताहर)काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात- दोन्ही गटातील मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना पोलीस ठाण्यात बसवून ठवेले आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर अटकेची कारवाई केली नसल्याचे सांगितले. गावात शांतता आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.