शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘तेव्हा’ वाटले आता भारत भूमीचे दर्शन होणार नाही

By admin | Updated: April 2, 2017 11:33 IST

पाकिस्तान हद्दीत गेल्यानंतर आपण पुन्हा भारतात येऊन आपल्या मातृभूमीचे दर्शन होईल असे वाटले नव्हते असे चंदू चव्हाण यांनी सांगितले.

 चंदू चव्हाण : मुलाखतीतून उलगडली ‘त्या’ रात्रीची आपबिती

जळगाव, दि.2 - भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या दुस:या रात्री 12 वाजता कश्मिर मधील पुंछ सेक्टर मध्ये 11 साथीदारांसोबत गस्त वर असताना अचानक पाकिस्तान आणि भारतीय सैन्यात तुफान गोळीबार झाला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे बाकीचे साथीदार माङयापासून वेगळे झाले, दोन-तीन तास सारखे चालल्यानंतर काही अधिकारी समोर आले. त्यांनी काही प्रश्न विचारले तेव्हा मला कळून चुकले की आपण बॉर्डर पार करून पाकिस्तानच्या सैन्याच्या तावडीत सापडलो.त्यांच्या सैनिकांच्या हाती लागल्यावर वाटले होते, की आता मृत्यू अटळ आहे व भारतीय भूमीचे आता दर्शन कधी होणार नाही. मात्र समस्त देशवाशियांच्या प्रार्थनेमुळेच आपण पुन्हा भारताच्या भूमीत आलो असल्याची भावना चंदू चव्हाण यांनी व्यक्त केली. 
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या वतीने शनिवारी गणपती नगरातील रोटरी भवनात खान्देशपुत्र चंदू चव्हाण यांचा सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखतीत चंदू चव्हाण यांनी ‘त्या’ रात्री घडलेली व पाकिस्तानच्या तावडीतील 114 दिवसांची आपबितीा सांगितली. सी.ए.अनिलकुमार शहा यांनी चंदू चव्हाण  यांची मुलाखत घेतली. यावेळी चंदू चव्हाणचे बंधू भुषण चव्हाण, रोटरी महेंद्र रायसोनी, नरेंद्र जैन, सचिल देवरे आदि उपस्थित होते. मुलाखती दरम्यान चंदू चव्हाण यांनी लहाणपणापासूनचा सर्व प्रवास यावेळी सांगितला. 
आजी-आजोबांनीच मोठे केले
चंदू चव्हाण यांनी सांगितले की, लहान असतानाच आई-वडिलांचे निधन झाले. यामुळे लहाणपणासूनच आजी-आजोबांनीच सांभाळ केला. दहावी र्पयतचे शिक्षण आत्यांकडे झाले. आठवीत असतानाच सैन्यात जायचे हे ठरवून घेतले होते. त्यातच मोठे बंधू सैन्यात भरती झाल्यानंतर त्याचापासूनच सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली. 2013 मध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर अहमदनगरला प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2015 मध्ये जम्मु काश्मिर मधील सांभा सेक्टर मध्ये पोस्टींग झाली असा संपूर्ण प्रवास चंदू चव्हाण यांनी मांडला. 
अधिका:यांशी झालेला वाद हा पाकिस्तानचा बनाव
भारतीय अधिका:यांशी वाद झाला त्यामुळे रागाच्या भरात पाकिस्तानी सिमेत दाखल झालो अशी चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा होती. भारतीय सैन्याला बदनाम करण्याचा हा  पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा हा बनाव होता अशी माहिती चंदू चव्हाण यांनी दिली. भारतीय सैन्यातील कुठल्याही अधिका:याशी कोणताही वाद झाला नसल्याचे चंदू चव्हाण यांनी सांगितले.
सूर्य प्रकाशही पहायला मिळाला नाही
पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांच्या लष्कराकडून नेहमी मारहाण केली जात असल्याचे चंदू चव्हाण यांनी सांगितले. तसेच इंजेक्शन दिले जात होते. जेवण अनेकदा मिळतच नव्हते. त्यानंतर त्यांनी कारागृहात रवानगी करून दिली. त्या कारागृहात नेहमी अंधार असायचा. सुर्यप्रकाश देखील  पहायला मिळत नव्हता. कारागृहात अनेकदा हिंदू देवतांच्या नामस्मरणाचा आवाज ऐकायला मिळायचा, त्यावरून त्या ठिकाणी इतर भारतीय असल्याचे जाणविले. कारागृहात असताना नेहमी भक्तीगीत म्हणायचो, भारतात आल्यानंतर आधीचे आठ दिवस काहीही कळले नसल्याची माहिती चंदू चव्हाण यांनी दिली.