शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे सत्र सुरुच, दोन दुकाने फोडली

By admin | Updated: January 25, 2017 00:47 IST

शहरात चोरटे सक्रीय : तापीनगरात लागोपाठ चोरीच्या घटनेने रहिवाशांमध्ये घबराट,यावलमध्ये तीन घरे फोडली

भुसावळ : शहरातील अत्यंत उच्चभ्रू लोकवस्तीमधील तापीनगरातील हिंदू हौसिंग सोसायटीत चोरटे सक्रीय झाले की काय असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. तापी नगरात एकाच रात्री दोन-तीन ठिकाणी चोरटय़ांनी धाडसी घरफोडी केली आहे. चोरटय़ांनी दोन दुकाने फोडून चांगलाच डल्ला मारला आहे. घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरीची घटना 23 व 24 जानेवारीच्या सकाळी 7 वाजे दरम्यान घडली. पोलीस निरीक्षक ई.के.पाडळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शहर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तापीनगरातील हिंदू हौसिंग सोसायटीमधील रमेश उद्धवदास आहुजा (वय 58) रा.सिंधी कॉलनी, आर.एस.आदर्श हायस्कूल जवळ यांच्या किराणा दुकानाच्या लाकडी दरवाजाच्या लोखंडी पट्टीवरील कुलूप  तोडून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला व दुकानातील  काही सुट्टी नाणी, मोबाईल चिचार्ज साहित्याची चोरी केली.  याच ठिकाणी असलेल्या पंकज फ्लोअर मिलच्या दरवाजावरील कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरीचा प्रय} केला मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेनाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.रमेश आहुजा यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गुरनंन.5/2017 भादंवि कलम 457,380 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)यावल वन विभागाचे कार्यालय फोडलेयावल शहरातील चोपडा रस्त्यावरील शहरापासून सुमारे तीन कि.मी. अंतरावरील  सामाजिक वनिकरण विभाग कार्यालयाच्या  वॉल  कंपाउंड   व कार्यालयाचे कुलूप तोडून  चोरटय़ांनी 11 हजार रुपये किमतीची वीज मोटारची वायर, 750 रुपये किमतीचे 25 टिकाव, सहा लोखंडी तगारी, असे  12 हजार  50 रुपयाचे साहित्य चोरून नेले अशी फिर्याद दगडू बु:हाण तडवी या कर्मचा:याने दिल्यावरून  भादंवि कलम 457, 380 प्रमाणे नोंद करण्यात आली.   शहरातील मदिना नगरातील किफायउल्ला अ. पिंजारी त्यांच्या पुतणीच्या साखरपुडय़ासाठी सहकुटूंब गावी गेले होते. त्यांचे बंद घर  चोरटय़ांनी सोमवारी रात्री फोडले. घरातील कपाटात ठेवलेली पाच तोळे वजनाची सोन्याची पोत, सात तोळे चांदिचे दागिने, पाच  गॅ्रम सोन्याची अंगठी, एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच अंगठय़ा असा दोन लाख 15 हजार रूपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन भादंवि  कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याच परिसरात  दोन घरे फोडली मात्र त्यांच्या हातात  काहीही लागले नाही.   चोरीस गेलेला ऐवज असा4रमेश किराणातून चोरटय़ांनी दोन किलो बदाम, फेशवॉश, डीओ, विविध कंपन्यांचे मोबाईल रिचाजर्, पेपर, व्हाऊचर्स, तेलाचे डबे, विविध कंपन्यांचे टूथ-पेस्ट असा एकूण साडेबारा हजार रुपये किंमतीचा माल लंपास केला.