जळगाव- सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दगडू दामू ठोसरे (रा़ जळगाव) यांच्या बंद घरात दोन महिलांनी सुमारे एक लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ या महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत़
ठोसरे हे बुधवारी सकाळी भुसावळ येथे गेले होते. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास दोन महिला ठोसरे यांच्या घराजवळ आल्या़ त्यांनी घरात कुणीही नसल्याची खात्री करीत घराच्या कंपाउंडमध्ये प्रवेश केला़ खालच्या मजल्यावरील कुलूप उघडता न आल्याने त्यांनी दुसºया मजल्यावरील खोलीकडे आपला मोर्चा वळवला़ नंतर कुलूप तोडून सोने-चांदी व काही रोकड असा सुमारे १ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला़ ठोसरे कुटुंबीय सायंकाळी परतले त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.