शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव दूध संघाला तीन वर्षांपासून दूध पुरवठा न करणाऱ्या संस्थांचे सभासदत्व रद्द होणार

By ajay.patil | Updated: September 24, 2023 19:05 IST

जिल्हा दूध संघाच्या वार्षिक बैठकीत निर्णय : खासगी संस्थांना दूध पुरविणाऱ्या संस्थाही आता रडारवर

जळगाव - जिल्हा दूध संघाला सलग तीन वर्षांपासून दूध पुरवठा न करणाऱ्या संस्थाचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघाच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासह ज्या संस्था दूध संघाच्या सभासद आहेत, मात्र खासगी संस्थांना दुध पुरवठा करणाऱ्या संस्थावर देखील कारवाई करण्याचा निर्णय सभेत बहूमताने मंजूर करण्यात आला.  

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवारी शहरातील एका हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले होते. या सभेत चेअरमन मंगेश चव्हाण, संचालक गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, संजय पवार, दिलीप वाघ, मधुकर राणे, अरविंद देशमुख, रोहित निकम, प्रमोद पाटील, डॉ.पुनम पाटील, शामल झांबरे, नितीन चौधरी, स्मिता वाघ, कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे आदी उपस्थित होते. या सभेत ११ विषय सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या सर्व विषयांना सार्वनुमते मंजूरी देण्यात आली.

जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदाची लागणार संचालकपदी वर्णीदूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की,  येत्या काळात संघाचा कारभार अतिशय पारदर्शक पध्दतीने करण्याचा प्रयत्न राहणार असून, जे सभासद दूध संघाला सर्वात जास्त दूध पुरवठा करतील अशा सभासदांची दूध संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा मंगेश चव्हाण यांनी केली. तसेच यावेळी दूध संघाकडून विकास चहा पावडर १ ऑक्टोबरपासून विक्रीला येणार असल्याचीही घोषणा करत, चहा पावडरची लॉन्चींग देखील करण्यात आले.