शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"दगड मारणारे हात आता खोक्यांनी भरले आहेत", अंबादास दानवेंचा गुलाबराव पाटलांना टोला

By विलास.बारी | Updated: April 23, 2023 15:05 IST

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आव्हान दिले जात आहे. मात्र तरीही ही सभा विराट होईल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

जळगाव : शिवसेनेच्या पाचोरा येथे होणा-या सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दगड फेकीचे आव्हान दिले जात आहेत. मात्र दगड मारणारे हे हात आता खोक्यांनी भरले असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जळगावात केला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही प्रशासनासोबतच पालकमंत्र्यांची असते. मात्र जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दगड मारण्याची भाषा करत असतील तर शासनाने व गृहविभागाने त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आव्हान दिले जात आहे. मात्र तरीही ही सभा विराट होईल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. सध्या निवडणुका नाहीत. सभेच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्ष हा लोकशाही मार्गाने आपले विचार मांडत असतो. ज्यांना एेकायचे असेल त्यांचे स्वागत आहे. ज्यांना एेकायचे नसेल त्यांनी कानात बोळे घालावे असा सल्ला त्यांनी दिला.

...तर तुमच्या सभा होतील तेव्हा आम्हाला विचार करावा लागेलमनसेकडून पाचो-यात खासदार संजय राऊत यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर बोलतांना ते म्हणाले की सभा रोखण्यासाठी असा प्रकार केला जात असेल तर भविष्यात तुमच्या सभा होतील तेव्हा आम्हाला देखील विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आव्हानाबाबत बोलतांना ते म्हणाले की, गुलाबराव पाटील यांचे दगड मारणारे हात राहिले नाही. ते खोक्यांनी केव्हाच भरले असल्याचा टोला त्यांनी लगावला.

गुलाबराव तुम्ही राजीनामा द्या संजय राऊत आव्हान स्विकारतीलगुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्याबाबत बोलतांना दानवे म्हणाले की, शिवतीर्थ मैदानावर केलेले भाषण गुलाबराव पाटील यांनी एेकावे त्यानंतर बोलावे. आधी तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्यावा तुम्ही राजीनामा दिल्यानंतर संजय राऊतदेखील तुमचे आव्हान स्विकारतील असे दानवे यांनी सांगितले.

...तर सरकारने दखल घ्यावी...जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनासोबत पालकमंत्र्यांची असते. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. मात्र तेच जर दगडफेकीची भाषा करत असतील तर या प्रकाराची सरकारने व गृहविभागाने दखल घ्यावी अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवे