शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांचा तो जीआर आला; आता परवानगीचा चेंडू प्रशासनाच्या कोर्टात!

By अमित महाबळ | Updated: September 17, 2023 17:42 IST

जळगाव शहरात लहानमोठी सुमारे ५०० पेक्षा अधिक मंडळे आहेत.

जळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी देण्याबाबत राज्य सरकारचा जीआर आला असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचा चेंडू आता प्रशासनाच्या कोर्टात आला आहे. जळगाव शहरात लहानमोठी सुमारे ५०० पेक्षा अधिक मंडळे आहेत.

दरवर्षीच्या गणपती उत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, पोलिस स्टेशन, वाहतूक शाखा, महावितरण यांची परवानगी मिळविण्यासाठी फिरावे लागते. या कामातच त्यांचा एक ते दीड महिना खर्ची होतो. प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी देखील यामध्ये अडकून राहतात. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर एकदम पाच वर्षांसाठी परवानगी देण्यावर विचार करावा, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. मात्र, कालपर्यंत त्याचा जीआर नव्हता, त्यामुळे ही परवानगी पुढील वर्षापासूनच मिळेल, असे म्हटले जाते. आता हा जीआरही आला आहे, त्यामुळे २०२३ ते २०२८ पर्यंत गणेश मंडळांना परवानगी देण्याचा चेंडू प्रशासनाच्या कोर्टात गेला आहे. जे नियमात बसतील त्यांना परवानगी द्या

शहरात लहानमोठी सुमारे ५०० मंडळे आहेत. त्यापैकी काहींनी परवानगी घेतली आहे, तर काहींची कार्यवाही सुरू आहे. यापैकी नवीन आदेशातील अटींच्या नियमात जे बसतील त्यांना आताच पाच वर्षांसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी केली आहे.

या आहेत अटी

- मागील दहा वर्षात सर्व नियम, कायदे यांचे पालन करणाऱ्या व कोणत्याही तक्रारी नसलेल्या गणेश मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत यांनी करावी.

- महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत यांच्या मालकीच्या जागेवर गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागा देताना नाममात्र शुल्क / १०० रुपये शुल्क मंडळांना आकारण्यात यावे.

- शासनाने ठरवून दिलेल्या अटी, शर्तींचे वेळोवेळी पालन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचे स्थानिक पोलिस स्टेशनकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाइन माध्यमातून सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी. सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मागणीला आलेले यश आहे. याबद्दल मुख्यमंत्री, गृहमंत्री व प्रशासनाचे आभार. ‘लोकमत’ने हा विषय मांडला होता. नगरविकास विभागाच्या आदेशान्वये २०२३ ते २०२८ पर्यंत मंडळांना त्वरित परवानगी मिळावी, अशी अपेक्षा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी व्यक्त केली आहे.