शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या भेटीला आलेल्या महिलेची पोत, मंगळसूत्र लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील सानेगुरुजी कॉलनीत आईच्या भेटीसाठी आलेल्या ठाणे येथील सुलोचना विश्‍वासराव पाटील (६५) या महिलेची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील सानेगुरुजी कॉलनीत आईच्या भेटीसाठी आलेल्या ठाणे येथील सुलोचना विश्‍वासराव पाटील (६५) या महिलेची पायी चालत असताना १ लाख ४४ हजारांची मंगलपोत चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची घटना २८ रोजी सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

ठाणे येथे सुलोचना पाटील या मुलगा डॉ. योगानंद पाटील, सून डॉ. ललिता पाटील व नातवंडासह वास्तव्यास आहेत. २७ रोजी त्या परिवारासह एरंडोल येथे शेती असल्याने त्या बघण्यासाठी आल्या होत्या. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास सुलोचना ह्या जळगाव शहरातील सानेगुरुजी कॉलनी येथे राहत असलेल्या त्याच्या आई निलावंती कृष्णा पाटील यांना भेटण्यासाठी आल्या. यावेळी चारचाकीतून उतरल्यानंतर त्यांचा मुलगा हा गावात निघून गेला. यावेळी सुलोचना या सानेगुरुजी गार्डन जवळून जात असताना त्याच्या पाठीमागून अंदाजे ३० ते ३५ वर्षाचा चोरटा आला. त्याने सुलोचना यांच्या गळ्यातील ९६ हजार रुपयांची दोन तोळ्याची सोन्याची पोत व ४८ हजार रुपयांचे एका तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने तोडून एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

दुचाकीवर बसून चोरटा पसार

पोत व मंगळसूत्र हिसकावल्यानंतर वृध्द महिलेने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटा हा काही अंतरावर उभ्या असलेल्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवर बसून पसार झाला. हा संपूर्ण प्रसंग एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. सोमवारी सायंकाळी रामानंदनगर पोलिसांनी पाहणी केल्यानंतर मंगळवारी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, याप्रकरणी सुलोचना पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात सोमवारी रात्रीच गुन्हा दाखल केला आहे.