शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कापड व्यावसायिकांनी सणांचे बुकींग थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 12:52 IST

दुहेरी संकट : जीएसटी पाठोपाठ गाळे जप्तीची टांगती तलवार

ठळक मुद्देजीएसटीचे पहिले संकटमोठय़ा बाजारपेठेला हादरातोडगा निघत नाही तो र्पयत माल खरेदी नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 - वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आता शहरातील व्यापारी संकुलांमधील गाळे जप्तीची टांगती तलवार असल्याने जळगावातील कापड व्यवसायावर संकट ओढावले असून व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांवर दसरा, दिवाळी सण आहे. या संभ्रमावस्थेमुळे  मालाची आगाऊ नोंदणी  करण्यास कापड व्यावसायिक धजावत नसल्याचे चित्र आहे. या वृत्तास काही कापड व्यावसायिकांनी दुजोरा दिला आहे. वस्तू व सेवा कर लागू होण्यापूर्वी केवळ रेडिमेड कापडांवरच कर लागत असे. मात्र आता 1 जुलैपासून शुटींग, शर्टीग, कापड यावरही 5 टक्के  जीएसटी लागत असल्याने कापड व्यावसायिकांना याचा फटका बसला. जळगावात कापड व्यवसायाची मोठी बाजारपेठ आहे. येथून जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भ या भागातही माल जातो. इतकेच नव्हे लग्नसराई व सणासुदीच्या काळात येथे खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे शहरात कापड व्यवसायाने मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. मात्र गाळे जप्तीच्या आदेशामुळे कापडाच्या या मोठय़ा बाजारपेठेस मोठा हादरा बसला आहे. गाळे प्रश्नी जो र्पयत तोडगा निघत नाही तोर्पयत मालाची खरेदी न करण्याच्या विचारात अनेक व्यावसायिक आहेत. इतकेच नव्हे सध्यादेखील अनेक व्यावसायिकांनी मालाची खरेदी थांबविली आहे. जीएसटीचा पुरवठादारांवर परिणामजीएसटी लागू झाल्यानंतर कापड निर्मिती व पुरवठादारांकडे काहीसा परिणाम दिसून येत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे येणा:या काळात मागणी  व त्या प्रमाणात पुरवठा होतो                की नाही याकडेही लक्ष लागून आहे. मात्र हळूहळू ही स्थिती सुधारेल,  असेही व्यावसायिकांचे म्हणण आहे. सणासुदीच्या दिवसात संभ्रमावस्थाशहरातील उलाढाल पाहता सणासुदीसाठी साधारण दोन महिने अगोदर मालाची आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यावेळी पुरेसा माल येथे उपलब्ध होतो. मात्र सध्या गाळे जप्तीच्या भीतीमुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे. गाळे प्रकरणी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, यासाठी गाळेधारक मोठय़ा आशेने नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या व्यथा मांडत आहे. त्यामुळे व्यवसायावरही परिणाम झाला आहे. 

गाळे प्रश्नामुळे मनात भीती निर्माण झाली असून दिवाळी, दसरा जवळ येत असला तरी सध्या मालाची बुकिंग थांबविली आहे. जो र्पयत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत माल खरेदी करण्याची मानसिकता नाही. -भरत समदडिया, कापड व्यावसायिक. 

मनामध्ये भीती, संभ्रम असला तरी व्यवसाय थांबविता येणार नाही. यावर काही तोडगा निघेल, या आशेने अनेक व्यावसायिक मालाची खरेदी करीत आहे.    -हिरानंद मंधवाणी, अध्यक्ष फुले मार्केट असोसिएशन.