शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या मृत्यूने तणाव

By admin | Updated: February 2, 2017 01:22 IST

शवविच्छेदनास नकार : तब्बल पाच तास चालला गोंधळ

जळगाव : कंजरवाडय़ातील संजय गांधी नगरात सलोनी विश्वास गारुंगे (वय 35) या विवाहितेने बुधवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्काराची तयारी केल्याने माहेरच्या लोकांनी सलोनी हिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करुन अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला, त्यामुळे कंजरवाडा परिसरात दुपारी साडे चार वाजेर्पयत तणावाची स्थिती होती.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सलोनी गारुंगे या विवाहितेने बुधवारी दुपारी बारा वाजता घरात कोणीच नसताना गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकाकडे साखरपुडय़ाच्या कार्यक्रमास गेलेल्या पती विश्वास गारुंगे यांना गल्लीतील लोकांनी घटना कळवली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून सलोनी यांना खासगी दवाखान्यात नेले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर मृतदेह घरी आणण्यात आला. दीड वाजेच्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी करीत असताना समोरच राहणा:या माहेरच्या लोकांनी त्यास विरोध केला. सलोनी हिचा छळ सुरु होता, त्यामुळे तिचा मृत्यू संशयास्पद आहे, असा आरोप करुन नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनला गोंधळसासरच्या लोकांवर कारवाई करावी म्हणून 50 च्यावर महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. सहायक निरीक्षक सचिन बागुल, समाधान पाटील, हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत, प्रकाश पवार यांनी तातडीने नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कुमक मागवून घटनास्थळ गाठले. तेथेही मृतदेह उचलण्यास नातेवाईकांनी विरोध केला. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत घातल्यानंतर एका रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.