शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील ३९ वाळू गटांची निविदा प्रक्रिया अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:21 IST

गटांना मंजुरीसाठी पर्यावरण समितीची बैठक

ठळक मुद्दे उच्च न्यायालयाची खर्चास मनाईमोजणीतील चमत्कार: दोनगावच्या ठेक्यात मंज़ुरीपेक्षा कमी उपसा

जळगाव: उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवीन वाळू लिलाव प्रक्रियेबाबत याचिका दाखल झालेली असल्याने न्यायालयाने वाळू ठेक्यांच्या प्रशासकीय तयारीला हरकत नसली तरीही जाहीरातीवर पैसे खर्च करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेसाठीची जाहिरात देणार येणार नसल्याने निविदा प्रक्रिया अडचणीत आली असून ती लांबणीवर पडणार आहे. दरम्यान शुक्रवार, १२ रोजी नवीन ३९ वाळू गटांना मंजुरी देण्यासाठी पर्यावरण समितीची बैठक होत आहे. निविदा प्रक्रिया लांबल्यास वाळू माफियांचे चांगलेच फावणार आहे.वाळू गटांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली असून नवीन वाळू गटांच्या निविदा प्रक्रियेची तयारी महसूल विभागाकडून सुरू आहे. त्यात यंदा संबंधीत ग्रा.पं. व भूजल सर्वेक्षण विभागाची ना-हरकत मिळालेल्या ३९ नवीन प्रस्तावित वाळू गटांना पर्यावरण समितीची मंजुरी बाकी आहे. ही मंजुरी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया करून वाळूचा ठेका दिला जाणार आहे. त्यासाठी पर्यावरण समितीची बैठक शुक्रवार, १२ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होत आहे. मात्र कृष्णकुमार अग्रवाल यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने राज्यभरातील वाळू ठेक्यांच्या प्रक्रियेत प्रशासकीय मंजुऱ्यांना स्थगिती दिलेली नसली तरीही त्यासाठी जाहिरातीवर खर्चास मनाई केली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया अडचणीत आली आहे.------------मोजणीतील चमत्कार: दोनगावच्या ठेक्यात मंज़ुरीपेक्षा कमी उपसादोनगावच्या वाळू ठेक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत असताना व मुदत संपेपर्यंत आदेश देऊनही जळगाव व धरणगाव प्रांत व तहसीलदारांनी मोजणी टाळली असताना मुदत संपल्यावर ठेका ताब्यात घेताना केलेल्या मोजणीत दिलेल्या मंजुरीपेक्षा कमीच उपसा केल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या मदतीने ही मोजणी करण्यात आली आहे. या ठेकेदाराला ८०४६ ब्रास वाळू उपसा करण्याची मंजुरी होती. मात्र केवळ ८०१२ ब्रासच वाळू उपसा केल्याचे अहवालात म्हटले असल्याचे समजते. एकीकडे वाळूची चोरी होत असताना लाखो रूपये मोजून घेतलेल्या ठेक्यातील वाळूचाही पूर्ण उपसा ठेकेदाराने केलेला नसल्याचा जावईशोध महसूल विभागाच्या अधिकाºयांनी लावला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी यात स्वत: लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.