शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गटाच्या दहा जागांसाठी होणार चौरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 21:22 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी २१ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्षांमध्ये देखील जोरदार हालचाली सुरु झाल्या असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवासेना, कॉँग्रेस-राष्टÑवादीसह इतर संघटनांच्या पदाधिकाºयांचे पॅनल व मनसे अशी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी३ रोजी अर्ज भरण्यास सुरुवातयुवासेना लढविणार सर्व जागा

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी २१ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्षांमध्ये देखील जोरदार हालचाली सुरु झाल्या असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवासेना, कॉँग्रेस-राष्टÑवादीसह इतर संघटनांच्या पदाधिकाºयांचे पॅनल व मनसे अशी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या प्राधिकरण प्रतिनिधीसाठी  अभ्यास मंडळ, व्यवस्थापन परिषदेच्या प्रतिनिधींच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात पार पडल्या. मात्र अधिसभा सदस्यांसाठी पदवीधर गटाची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या प्राधिकरणे देखील अद्याप गठीत झालेली नाही. २१ जानेवारी रोजी आता निवडणूक होणार असल्याने इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

कॉँग्रेस,राष्टÑवादीच्या सदस्यांची झाली बैठकपदवीधर गटाच्या निवडणुकीसाठी ३ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. त्यासाठी शनिवारी जळगावात राष्टÑवादी, कॉँग्रेससह इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीत पदवीधर गटाच्या १० जागांसाठी उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात आली. बैठकीला माजी अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, प्रभाकर चव्हाण, कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, अविनाश भालेराव,देवेंद्र मराठे यांच्यासह काही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली.

युवासेना लढविणार सर्व जागापदवीधर गटाच्या सर्व १० जागा युवासेना व शिवसेना लढविणार असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रितेश ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील या निवडणुकांच्या उमेदवारांबाबतची माहिती मागविली असल्याचे प्रितेश ठाकुर यांनी सांगितले. २ किंवा ३ रोजी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याचे शिवसेना व युवासेना जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व उमेदवारांची नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

अभाविपसह मनसेही रिंगणातअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जळगावात झालेल्या अधिवेशनात विद्यापीठाच्या पदवीधर गटाच्या सर्व १० जागा लढविण्याची घोषणा झाली होती. तर मनसेचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.जमील देशपांडे यांनी विद्यापीठ नवनिर्माण मंचची स्थापना केली असून, या मंचाव्दारे पदवीधर गटाच्या दहा जागा लढविल्या जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.जमील देशपांडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.