शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसात चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:05 IST

सोन्यातही चढ-उतार

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणामदहा दिवसात सोने पाचशे रुपयांनी वधारले

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 06-  आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच खरेदीमध्ये विक्रेत्यांनी घेतलेला आखडता हात यामुळे सोन्याच्या भावात चढ-उतार सुरू आहे. मात्र चांदीच्या भावात दहा दिवसात थेट एक हजार रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.  जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असून येथे सुवर्ण खरेदीसाठी विविध राज्यातील ग्राहक पसंती देत असतात. सध्या सोन्याच्या भावामध्ये राजधानीत घसरण होत असली तरी जळगावात त्याचा फारसा परिणाम नाही. उलट शुक्रवारी सोन्याच्या भावात दीडशे रुपये प्रति तोळ्य़ाने वाढ झाली आहे. 

दहा दिवसात सोने पाचशे रुपयांनी वधारलेसिंगापूर सराफ बाजारात सोन्याचे भावात घसरण होण्यासह भारतात राजधानी दिल्लीमध्ये ज्वेलर्सनी खरेदीत हात आखडता घेतल्याने सोन्याचे भाव गुरुवारी कमी झाले होते. जळगावातही 50 रुपये प्रति तोळ्य़ाने भावात घसरण झाली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा दीडशे रुपये प्रति तोळ्य़ांनी वाढ झाली. एकूणच जळगावात सोन्याच्या भावात चढ-उतार होत असली तरी दहा दिवसात सोन्याचे भाव 500 रुपये प्रति तोळ्य़ांनी वाढले आहे. 27 डिसेंबर रोजी असलेल्या सोन्याच्या 29500 रुपये भावात एकाच दिवसात 300 रुपयांनी वाढ होऊन 28 रोजी ते 29, 800 रुपये प्रति तोळा झाले. त्यानंतर 1 जानेवारी रोजी असलेल्या 29,900 रुपये भावात 4 रोजी पुन्हा 50 रुपयांनी घसरण ते 29,850 रुपयांवर आले. यात पुन्हा 5 रोजी एकाच दिवसात 150 रुपयांनी वाढ होऊन ते 30,000 रुपयांवर पोहचले. 

लग्नसराईची खरेदी नसताना भावात वाढसध्या गुढीमुळे लग्नसराईला ‘ब्रेक’ लागलेला आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी होणारी सोन्याची खरेदीही थांबली आहे. असे असले तरी सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात 10 दिवसात 500 रुपयांनी वाढ झाली आहे. 

चांदीत एक हजार रुपयांनी तेजीसोने पाठोपाठ चांदीमध्येही 10 दिवसात तेजी आली आहे. 27 डिसेंबर रोजी 39,000 रुपये प्रति किलो असलेल्या चांदीच्या भावात एकाच दिवसात 500 रुपयांनी वाढ होऊन 28 डिसेंबर रोजी ते 39,500 रुपये झाले. त्यानंतर त्यात पुन्हा वाढ होत 5 जानेवारी रोजी हे भाव 40,000 रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. 

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणामभारतात विविध देशातून चांदीची आयात होत असते. त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती पाहता त्याचा आयातीवर परिणाम होऊन चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

जळगावात मोठय़ा दालनांमध्ये चांदीचे भाव 40 हजार रुपये किलो असले तरी लहान दुकानांमध्ये हे भाव 40,800 रुपये प्रति किलो असल्याचे चित्र आहे. 

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. यात 10 दिवसांमध्ये चांदीचे भाव एक हजार रुपये प्रति किलोने वाढले आहे. - गौतमचंद लुणिया, अध्यक्ष, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन.