शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चालकास डुलकी लागल्याने  टेम्पो उलटून १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 19:34 IST

पारोळा : तालुक्यातील टेहू गावालगत नगर जिल्ह्यातून दर्शनाहून परतणा-या भाविकांच्या टेम्पोचालकास डुलकी लागल्याने टेम्पो रस्त्याखाली आदळला. हा अपघात १३ ...

पारोळा : तालुक्यातील टेहू गावालगत नगर जिल्ह्यातून दर्शनाहून परतणा-या भाविकांच्या टेम्पोचालकास डुलकी लागल्याने टेम्पो रस्त्याखाली आदळला. हा अपघात १३ जुलै रोजी पहाटे ४ वाजता घडला.तालुक्यातील टेहू गावालगत नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोंढा देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या टेम्पोच्या चालकास डुलकी आली. त्यामुळे त्याला वाहनांचा अंदाज आला नाही. टोम्पोचा ताबा सुटत रस्त्याखाली आदळून यात तब्बल १५ भाविक जखमी झाले. यात ३ जण गंभीर जखमी असून त्यांना पारोळा येथून जळगावला उपचारार्र्थ हलविण्यात आले़याबाबत रूग्णसेवक ईश्वर ठाकून यांनी सांगितले की, जळगाव व भुसावळ येथील दोन ते तीन कुटुंब त्यांच्या दैवत असलेल्या मोंढा देवीच्या दर्शनासाठी जळगाव येथून टेम्पो (क्रमांक एम़एच-१९-सीवाय-२५६४)ने जात होते. त्यात एकूण १५ जणांचा समावेश होता. ते १२ जुलै रोजी येथून निघाले होते. दर्शन आटोपून सदर वाहनात १३ जुलै रोजी परतीच्या मार्गावर असताना चाळीसगावमार्गे पारोळाकडे येत असताना मेहू-टेहू गावाजवळ पहाटे ४ वाजेदरम्यान टेम्पोचालकास झोपेची डुलकी आली. त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहन भरवेगात रस्त्याच्या पलीकडे उलटले. त्यात एकूण १५ जण जखमी झाले. हे सर्व जळगाव व भुसावळ येथील आहेत. यात चंद्रकांत पांढरे (जळगाव), मालतीबाई पांढरे, अक्षदा पांढरे, रमेश जावरे (भुसावळ), दीक्षा शांताराम सपकाळे, इशिका भालेराव (जळगाव), मनीषा सपकाळे (भुसावळ), शांताराम सपकले (भुसावळ), भीमराव भालेराव (जळगाव), अशोक भालेराव (जळगाव), शारदा कंडेर (जळगाव), सुधाकर यवलकर, अश्विनी भालेराव, सरिता निदाने (जळगाव) या जखमींचा समावेश आहे. त्यांच्यावर पारोळा कुटीर रूग्णालय येथे डॉ़ योगेश साळुंखे, डॉ़ सुनील पारोचे, डॉ़ राहुल जैन, सुनिता काथार, राजू वानखेडे यांनी प्राथमिक उपचार केले. यावेळी ईश्वर ठाकूर यांनी सर्व रूग्णांना जळगाव येथे हलविले़पोलिसांना माहिती नाहीविशेष म्हणजे सदर घटनेला ८ तास उलटूनही पोराळा पोलीस स्टेशनला सदर माहिती कोणी न दिल्याने याबाबत बीटचे पोलीस अनभिज्ञ होते़ वाहनाचे मोठे नुकसान झाल्याने सदर वाहन उचण्याकरिता क्रेन बोलावण्यात आले होते़