शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोनाच्या उच्चांकी तापमानापुढे 'मे हीट'चे तापमान पडले फिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:58 IST

जिल्ह्याच्या वाढत्या तापमानाच्या चर्चाना यंदा कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : जिल्ह्याचे तापमान ४६ डिग्रीच्या जवळपास पोहोचले असताना 'कोरोना'च्या वाढत्या उच्चांकी तापमानामुळे 'मे हीट'ची चर्चा फिकी पडली आहे. शनिवारी ४५.४४ डिग्री तापमानाची नोंद न्हावी येथील कृषी शासकीय कार्यालयावर घेण्यात आलेली होती. मात्र त्यावर कोठेच चर्चा होताना दिसली नाही.दरवर्षी एप्रिल-मे मध्ये जिल्ह्यातील तापमानाची राज्यातच नव्हे तर देशात चर्चा होत असे व एकप्रकारे या उष्ण तापमानाची दहशत होती. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे या तापमानाच्या चर्चांना एकप्रकारे ब्रेकच लागलेला आहे.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या अडीचशेच्या जवळपास आहे व दररोज ही संख्या वाढतच आहे. मुंबई-पुणे मालेगाव नंतर जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे एरवी दरवर्षी जिल्ह्याच्या तापमानाबद्दल राज्यातच नव्हे तर देशात चर्चा होत असे.दरवर्षी प्रत्येक उन्हाळ्यात जिल्ह्याचे तापमान ४५- ४६ नव्हे तर ४८ डिग्रीपर्यंत जात असल्याने एकप्रकारे रस्त्यावर संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असे.त्यातच एप्रिल-मे मध्ये असलेली लगीनघाई, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, ए सी, कुलरची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री, आईस्क्रीम, कुल्फी व रसवंतीवर होणारी आबालवृद्धांची गर्दी, सुट्टीच्या काळात मामाच्या गावाला जाऊया याची असलेली धूम हे सर्व आता यंदा दुर्लभ झाले आहे.या वर्षीसुद्धा दररोज तापमान ४५/४६ डिग्रीवर जात आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या उच्चांकी तापमानाने सूर्यदेवाच्या या तापमानाला फिके केले असून, त्याची चर्चासुद्धा नाही हे प्रथमच मिळत आहे.चर्चा आहे केवळ कोरोना कोरोना व कोरोनाचीच.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFaizpurफैजपूर