शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तेजश्री वाघ, इशांत इनामदारला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:56 IST

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव विभागस्तरीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत रायसोनी आयबीएम आणि मुलींच्या गटात संत गाडगेबाबा महाविद्यालयाने विजय मिळवला आहे. मुलींमध्ये तेजश्री वाघ हिने तर मुलांच्या गटात इशांत इनामदार याने सुवर्ण पदकाची कमाई केली. ही स्पर्धा बुधवारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या गटात १४० आणि मुलींच्या गटात ...

ठळक मुद्देआंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धासांघिक गटात रायसोनी आयबीएम आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय विजयीविजयी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव विभागस्तरीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत रायसोनी आयबीएम आणि मुलींच्या गटात संत गाडगेबाबा महाविद्यालयाने विजय मिळवला आहे. मुलींमध्ये तेजश्री वाघ हिने तर मुलांच्या गटात इशांत इनामदार याने सुवर्ण पदकाची कमाई केली. ही स्पर्धा बुधवारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या गटात १४० आणि मुलींच्या गटात ६० खेळाडू सहभागी झाले होते.विभागीय बुद्धिबळ स्पर्धा २२ आणि २३ सप्टेंबर रोजी साक्री येथील एस.जी. पाटील महाविद्यालयात होणार आहे.  मंगळवारी सायंकाळपर्यंत आघाडीवर असलेल्या इशांत इनामदार आणि तेजश्री वाघ यांनी या स्पर्धेत विजय मिळवला.पंच म्हणून प्रवीण ठाकरे, प्रा. आसिफ  खान यांनी काम पाहिले. यशस्वितेसाठी पवनकुमार देवरे, कार्तिक मालविया, ललित झांबरे, महेश व्यास, वर्षा सोनवणे यांनी काम पाहिले. 

मुलांच्या गटात रायसोनी आयबीएमने सांघिक विजेतेपद पटकावले. रायसोनी आयबीएम आणि मू.जे. महाविद्यालयाने १८.५ गुणांची बरोबरी साधली. मात्र टायब्रेकर पद्धतीने रायसोनी आयबीएमला विजयी घोषित करण्यात आले. मू.जे.ने द्वितीय स्थान पटकावले. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिसरे स्थान पटकावले.मुलींच्या गटात संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने १५ गुणांसह जेतेपद पटकावले. तर १४ गुणांसह मू.जे. महाविद्यालय दुसºया तर १३.५ गुणांसह कोटेचा महिला महाविद्यालय तिसºया स्थानावर          राहिले. 

विभागीय पातळीवर निवड झालेले खेळाडू मुले - इशांत इनामदार (शासकीय अभियांत्रिकी), जलीस कुरेशी (रायसोनी आयबीएम), आकाश धनगर (नूतन मराठा महाविद्यालय), निखिल पाटील (मू.जे. महाविद्यालय), शोएब शेख (रायसोनी आयबीएम).मुली - तेजश्री वाघ (मू. जे. महाविद्यालय), फाल्गुनी चौधरी (जे.टी. महाजन महाविद्यालय), दिव्या कोळी (कोटेचा महाविद्यालय), श्रुती काबरा (बाहेती महाविद्यालय), दीक्षिता गुजर (शासकीय अभियांत्रिकी).