चोपडा : भोगवटादार वर्ग-२ ची प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी तहसीलदारांना वेळ नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील सर्वांत जास्त खेडी आहेत. त्यामुळे कुटुंबांची व घरांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात शासनाकडून मिळालेल्या तसेच काही कारणाने चुकून भोगवटादार वर्ग-२ किंवा ‘ब’ असलेल्या मिळकतीही भरपूर आहेत. शासनाने निर्णय काढून भोगवटादार वर्ग-२च्या शेतजमिनी/ घरे वर्ग-१मध्ये रूपांतरणासाठी काढलेला आहे व त्याचा लाभ लोकांना मिळावा, अशी शासनाची धारणा आहे. त्यासाठी विविध तालुक्यांमध्ये प्रांताधिकारी व तहसीलदार हे त्यासाठी विशेष मोहीम, कार्यक्रम राबवित आहेत.
बांधीव घरावर नजराणा आकारणी करायची का खुल्या भूखंडावर करायची याबाबत संभ्रम होता. म्हणून काही प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र भोगवटा बाबतीतील प्रकरणे प्रलंबित ठेवले जात नाही. लागलीच प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविली जातात.
-अनिल गावित, तहसीलदार, चोपडा