शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनासाठी अवलंबला तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याने चोरीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 22:38 IST

अभियंता होण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनला प्रवेश घेतला, तेथे  धडे गिरवतांना वाईट मार्गाने जाणाºया मित्रांच्या संपर्कात राहून व्यसन जडले अन् या व्यसनासाठी पैसा लागणार असल्याने विद्यार्थ्याने थेट चोरीचाच मार्ग निवडल्याचे उघड झाले आहे. शासकीय वसतीगृहात ज्या मित्राने राहायला जागा दिली, त्याचाच ३८ हजार रुपयांचा कॅमेरा व अन्य साहित्य चोरणाºया दीपक अनिल अहेर (वय १९ रा.न्यायडोंगरी, ता.नांदगाव ) याला रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देवसतीगृहातील विद्यार्थ्याने चोरला मित्राचा कॅमेरा  डमी ग्राहक बनून घेतले ताब्यातविना परवानगी राहत होता वसतीगृहात

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३ :  अभियंता होण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनला प्रवेश घेतला, तेथे  धडे गिरवतांना वाईट मार्गाने जाणाºया मित्रांच्या संपर्कात राहून व्यसन जडले अन् या व्यसनासाठी पैसा लागणार असल्याने विद्यार्थ्याने थेट चोरीचाच मार्ग निवडल्याचे उघड झाले आहे. शासकीय वसतीगृहात ज्या मित्राने राहायला जागा दिली, त्याचाच ३८ हजार रुपयांचा कॅमेरा व अन्य साहित्य चोरणाºया दीपक अनिल अहेर (वय १९ रा.न्यायडोंगरी, ता.नांदगाव ) याला रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सौरभ सुनील पाटील (वय १९ रा.मोरगाव,ता.रावेर) हा विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतनला मेकॅनिकच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. वसतीगृहाच्या २०२ क्रमांकाच्या खोलीत तो वास्तव्य करीत आहे. दीपक अहेर हा विद्यार्थी देखील याच ठिकाणी शिक्षण घेत आहे. दोन विषयात नापास झाल्यामुळे त्याला प्रशासनाने वसतीगृहात राहण्यास परवानी दिलेली नव्हती, मात्र तरीही सौरभ याने बाहेर गावाचा विद्यार्थी असल्याने त्याला स्वत:च्या खोलीत राहायला जागा दिली. त्याचा गैरफायदा घेत दीपक याने २३ आॅक्टोबर रोजी सौरभ हा बाहेर गेल्याची संधी साधत दीपक याने दरवाजाचा कडीकोयंडा वाकवून कुलुप तोडले. त्यानंतर सौरभचा ३६ हजार ९९० रुपये किमतीचा कॅमेरा, ८०० रुपये किमतीचे पेनड्राईव्ह, मेमरीकार्ड असा ३८ हजार २९० रुपयांचा ऐवज चोरला होता.

डमी ग्राहक बनून रचला सापळा कॅमेरा चोरी झाल्यानंतर सौरभ याने शुक्रवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम यांनी चौकशी करण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला केल्या. त्यानुसार प्रदीप चौधरी व शरद पाटील यांना हा कॅमेरा दीपक याने चोरल्याची कुणकुण लागली. त्यानुसार खात्री करण्यासाठी सहायक फौजदार गोपाळ चौधरी, विलास शिंदे, विजय खैरे, अतुल पवार, ज्ञानेश्वर कोळी व सागर तडवी यांनी तंत्रनिकेतनमध्ये सापळा लावला. प्रदीप चौधरी यांनी कॅमेरा विकत घेण्यासाठी डमी ग्राहक पाठवून दीपक याला कॅमेरा आणायला लावला. वसतीगृहातून कॅमेरा आणताच पोलिसांनी त्याला पकडले.