शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समाजावर प्रेम, परोपकार हिच संतांची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 20:27 IST

स्वत:ला महत्त्व न देता साधारण व्यक्ती म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज स्वत:ही कमी बोलत होते, पण कमी बोलण्यात, त्यांच्या वाणीत गोडवा होता. चांगले कपडे, चांगली गाडी हा आपला परिचय नसून, समाजावर प्रेम, परोपकार व संस्कार हाच आपला परिचय आहे, अशी शिकवण देणारे जगन्नाथ महाराज यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी समाधी स्थळी उपस्थित असंख्य भाविक भक्तांना आशीर्वचन देताना सांगितले.

ठळक मुद्देफैजपूर येथे दोन दिवसीय कार्यक्रमात संतांचे आशीर्वचनमहामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज समाधी स्थळी असंख्य भाविकांची हजेरीसतपंथ संस्थानचा अधिकृत पेन आणि ११ कोटी मंत्र जप लिहिलेल्या वह्यांचे पूजन संतांच्या हस्ते पूजन

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : स्वत:ला महत्त्व न देता साधारण व्यक्ती म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज स्वत:ही कमी बोलत होते, पण कमी बोलण्यात, त्यांच्या वाणीत गोडवा होता. चांगले कपडे, चांगली गाडी हा आपला परिचय नसून, समाजावर प्रेम, परोपकार व संस्कार हाच आपला परिचय आहे, अशी शिकवण देणारे जगन्नाथ महाराज यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी समाधी स्थळी उपस्थित असंख्य भाविक भक्तांना आशीर्वचन देताना सांगितले.ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज यांचा सतरावा पुण्यतिथी महोत्सव १३ व १४ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील असंख्य भाविक उपस्थित होते.व्यासपीठावर परमपूज्य छगनबाप्पा, परमपूज्य संत गोपालचैतन्य महाराज, महामंडलेश्वर पुरुषात्तम महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, शामचैतन्यदासजी महाराज, अंकुश महाराज, नितीन महाराज, ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी यासह अनेक संत उपस्थित होते.वृंदावनधाम पाल येथील गोपालचैतन्यजी महाराज यांनी आशीर्वचन दिले की, मनुष्य जीवनाचे रहस्य गुरूंच्या सानिध्यात राहून समजते. परम गुरू शरीररुपी नसून एक तत्त्व आहे. त्यांच्या कृपेने मनुष्य संसारिक तापातून मुक्त होतो. म्हणून प्रत्येकाने गुरूंचा उपदेश सर्वोत्कृष्ट मानावा, असे सांगितले. सतपंथाचे कार्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सातासमुद्रापार तर पोहचवलेच; पण फैजपूर नगरीत सर्वधर्माच्या संतांंना एकाच व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे जगाच्या पाठीव फैजपूर नगरीचा नावलौलिक झाला आहे.कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज यांनी पुण्यतिथी अशाच संतांची साजरी केली जाते की जे ब्रह्मलिन होऊन आपले कार्य समाजासाठी भविष्यात प्रेरणा दायक ठरते, म्हणून आपण या ठिकाणी आज असंख्य संख्येने उपस्थित आहात. यासह महामंडलेश्वर पुरुषत्तम दासजी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, परमपूज्य छगणबाप्पा महाराज यांनी आशीर्वचन दिले.दरम्यान, सतपंथ संस्थानचा अधिकृत पेन आणि ११ कोटी मंत्र जप लिहिलेल्या वह्यांचे पूजन संतांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, संजय गांधी अध्यक्ष विलास चौधरी, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यासह असंख्य भाविक उपास्थित होते. सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन व निर्मल चतुर यांनी केले आहे.गुरुवारी सायंकाळी पुण्यतिथी महापूजा तसेच शुक्रवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. नागरिकांनी शोभायात्रे दरम्यान रांगोळी काढूून सजवण्यात आले होते. यात फैजपूर, चिनावल, राजोरा, मलकापूर, खडका, विवरा, वढोदा येथील भजनी मंडळ सहभागी होते. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर