भुसावळ : ज्या शिक्षकांनी आपल्याला घडविले त्यांच्याच परिश्रमातून विविध क्षेत्रांमध्ये आपण उंची गाठली अशा शिक्षकांचा ५ सप्टेंबर शिक्षक दिन औचित्य साधून या दिवशी गुरू-शिष्यांच्या नात्यांतील पवित्र परंपरा जपण्यासाठी दरवर्षीप्रमाणे नगरसेवक मुकेश नरेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून स्व. नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. प्रभागातील १८५ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
क्षेत्र कोणतेही असो किंवा विज्ञान तंत्रज्ञानाने कितीही प्रगती करो, त्यामागे जे ज्ञान असते ते मानवाचेच. जगात सतत बदल होतात, नवनवे शोध लावण्यासाठी विद्यार्थी तयार करतात ते शिक्षकच. आमच्या जीवनात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांची प्रगती हेच त्यांच्या परिश्रमाचे समाधान असते, म्हणूनच कुणी कितीही मोठ्या पदावर असला तरीही त्याच्या प्रगतीचे श्रेय जाते ते शिक्षकांनाच, असे शिक्षकांचा सन्मान करताना नगरसेवक मुकेश पाटील यांनी सांगितले.