धुळे : मनपावर असलेल्या तापी योजनेच्या कर्जामुळे मनपाला मोठा आर्थिक फटका बसत आह़े प्रत्येक अनुदान व निधीतून कर्जाचे हप्ते कपात होत असल्याने मनपाने 166 कोटींचे कर्ज माफ व्हावे यासाठी प्रयत्न चालविले आहेत़ यापूर्वी 166 कोटी 68 लाख 96 हजार 351 रुपयांच्या या कर्जातून जवळपास 40 कोटी रुपये अनुदान व निधीच्या माध्यमातून कपात करून फेडण्यात आल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ मात्र या कर्जापोटी आणखी किती रक्कम मनपाला भरावयाची आहे ही माहिती मिळू शकली नाही़