शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

थांबलेल्या कंटेनरवर टॅंकर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST

हवा तपासणी करणारा चालक ठार फोटो जळगाव : महामार्गाला लागून थांबलेल्या कंटेनरवर धुळ्याकडून आलेला टॅंकर धडकला.यात कंटेनरच्या टायरची ...

हवा तपासणी करणारा चालक ठार

फोटो

जळगाव : महामार्गाला लागून थांबलेल्या कंटेनरवर धुळ्याकडून आलेला टॅंकर धडकला.यात कंटेनरच्या टायरची हवा तपासणी करणारा चालक दिलीप मारुती पाखरे (रा. पिंपळगव्हाण ता. पाथरी जि. अहमदनगर ) ठार झाला तर नामदेव भीमराव महाजन (रा.धामणगाव ता. आष्ठी जि. बीड ) जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी सकाळी साडेसहा वाजता अजिंठा चौफुली जवळ झाला. याप्रकरणी रात्री एमआयडीसी पोलिसात टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केमिकलचे ड्रमने भरलेला कंटेनर (क्रमांक एमएच ४६ एच ६४९७) चालक दिलीप मारूती पाखरे व नामदेव भीमराव महाजन असे दोघे रविवारी सकाळी सहा वाजता अजिंठा चौकानजीक पार्कींगला लावत होते. ६.२० वाजेच्या सुमारास धुळ्याकडून भुसावळकडे जाणारा टँकर (एमएच ४३ बीपी ५५६९) भरधाव वेगाने येवून उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर चालक दिलीप पाखरे हे चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर नामदेव महाजन हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच टँकर चालक टँकर सोडून पळून गेला. याप्रकरणी नामदेव महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.