शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

तांबापुरात दोन गटात धुमश्चक्री

By admin | Updated: July 24, 2016 11:53 IST

क्षुल्लक कारणावरुन तांबापुरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. त्यात एका गटाकडून तलवारी काढण्यात आल्या.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. २४ -   क्षुल्लक कारणावरुन तांबापुरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. त्यात एका गटाकडून तलवारी काढण्यात आल्या; तर प्रतिस्पर्धी गटाकडून प्रत्युत्तर म्हणून विटांचा मारा करण्यात आला. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी दोन्ही गटाच्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून अन्य संशयितांची रात्रभर धरपकड सुरु होती.

लहान मुलांच्या भांडणावरुन वाद उफाळलाशिरसोली नाक्याला लागून असलेल्या तांबापुरात शुक्रवारी संध्याकाळी बावरी व गवळी गटात लहान मुलांच्या भांडणावरुन वाद झाला होता. हा वाद शनिवारी रात्री पुन्हा उफाळून आला. समाधान हटकर (गवळी) याला मारण्यासाठी बावरी गटाकडून दहा ते बारा जण धावून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गवळी गटाचेही दहा ते बारा जण धावून आले. बावरी गटाने तलवारी काढून गवळी गटावर चाल केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून गवळी गटाने विटा व दगडांचा मारा सुरु केला. त्यामुळे तांबरापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांवर दगडफेकतांबापुरात दोन गटात वाद झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी कर्मचारी रवाना केले. तर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनीही कमांडो पथक रवाना केले, त्यामुळे संशयितांची पळापळ झाली. धरपकड मोहीमेत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. सहायफ फौजदार रत्नाकर झांबरे, शरद भालेराव, अशरफ शेख, गोविंदा पाटील, परेश जाधव, विजय पाटील आदी कर्मचाऱ्यांच्या दिशेनेही दगडफेक झाली. मात्र त्यापासून त्यांनी बचाव केला. यावेळी एका चारचाकीचे नुकसान झाले आहे.