शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आमची किडनी घ्या; मात्र शहरातील रस्ते करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, मनपाकडून आर्थिक परिस्थितीचे कारण देत शहरातील रस्त्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, मनपाकडून आर्थिक परिस्थितीचे कारण देत शहरातील रस्त्यांची कामे देखील थांबली आहेत. त्यामुळे वैतागलेल्या जळगावकरांनी मनपा प्रशासनाला आपली किडनी घेऊन, ती विक्री करून मिळालेल्या रकमेतून शहरातील रस्ते तयार करण्याचे साकडे घातले आहे. कर भरून देखील जळगावकरांना सुविधा मिळत नसतील तर करासोबत किडनी देखील घ्या; मात्र शहरातील रस्ते करा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

सोमवारी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिकांनी मिळून मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शिवराम पाटील, विजय बांदल, अमोल कोल्हे, मतिन पटेल, संजय पाटील, अनिल नाटेकर, किरण ठाकूर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. दीपककुमार गुप्ता यांनी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन दिले. शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली असून, यामुळे जळगावकरांना पाठीचे, मानेचे, मणक्यांचे विकार होत आहेत. त्यात अनेक लहान-मोठे अपघात होऊन हाता-पायालादेखील दुखापत होत आहे. इतर विकार होण्यापेक्षा आता आमच्या किडनी घेऊन, ती विक्री करून मिळालेल्या रकमेतून खड्डे दुरुस्त केले तर अनेकांना भविष्यात होणाऱ्या त्रासापासून दूर ठेवता येईल असे गुप्ता यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत गुप्ता यांनी निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे देखील पाठविल्या आहेत. चोपडा,पाचोरा सारख्या नगरपालिकांच्या हद्दीत चांगले रस्ते असताना, महापालिकेच्या हद्दीत चांगले रस्ते मिळत नसल्याने आता नागरिकांना चांगल्या रस्त्यांसाठी किडनी देण्याशिवाय पर्याय नसल्याचे गुप्ता यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.