शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 10:47 IST

जळगावच्या महिला डॉक्टरांचा एडस्ग्रस्त मुलांच्या जीवनात ‘प्रकाश’ आणण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देप्रोटीनयुक्त आहाराचे करताय वाटप

चुडामण बोरसे ।जळगाव : घरात सर्व काही असताना एका महिला डॉक्टरांना आगळा - वेगळा छंद जडला आहे. कवी विंदा करंदीकर यांच्या देणाऱ्याने देत जावे... घेणाºयाने घेत जावे... आणि एक दिवस देणाºयाचे हात घ्यावे... अशीच एक वेगळी सेवा त्या करीत आहेत.जळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एडस्ग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी त्या मुलींच्या रिमांड होममध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांनी मुलींची नेत्र आणि दंत तपासणीची केली. यातून मग मुलांच्या सेवेचा छंदच त्यांना लागला. एकदा मग जळगावातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील यांच्याशी त्यांची ओळख झाली. यातून मग एडस्ग्रस्त मुलांसाठी काहीतरी करायला हवे, हा विचार पुढे आला. सुरुवातीला त्यांनी एका एडस्ग्रस्त मुलाला दत्तक घेतले. मग हळू हळू ही संख्या वाढू लागली आणि आज जवळपास ७० एडस्ग्रस्त मुलांना त्या महिन्याला सकस आहार पुरवित आहेत. कधी निधी जमा करुन तर कधी पदरमोड करुन. जागतिक आरोग्य संघटनेने एडस्ग्रस्त मुलांच्या आहारात काय असावे, याचे मागदर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्यानुसार हा आहार दिला जातो. विशेष म्हणजे डॉ. नीलीमा सेठीया यांच्या हाकेला जळगावातील अनेक दाते पुढे आले आहेत. ते दर महिन्याला न चुकता आहारासाठी निधी एकत्र करुन तो त्यांच्याकडे देत असतात. नीलीमा यांनी स्वत: एडस्ग्रस्त ११ मुले दत्तक घेतली आहेत. त्यांच्यासह त्या आज जवळपास ७० मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.मराठे ता. चोपडा येथील आश्रमशाळेलाही डॉक्टरांनी मोठी मदत केली आहे. तीन वर्षापूर्वी त्या या आश्रमशाळेत गेल्या होत्या. त्यावेळी तिथे फक्त एक आठवडा पुरले एवढेच अन्नधान्य होते. डॉ. सेठीया यांना हे कळताच त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना याची माहिती दिली आणि अखंडपणे मदतीचा ओघ सुरु झाला. तो आजतागायत सुरु आहे.