जळगाव - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग.स.सोसायटीची आगामी निवडणूक ही इव्हीएम मशीनव्दारे घेण्याची मागणी सहकार गटाचे गटनेते उदय पाटील यांनी केली आहे. याबाबत पाटील यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे निवेदन सादर केले आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढते, तर इव्हीएममुळे कमी कर्मचाऱ्यात ही प्रक्रिय पार पाडता येवू शकते असेही पाटील यांनी म्हटले आहे.
फेसर्डी येथे राजे छत्रपती चषकाचे आयोजन
जळगाव - तालुक्यातील फेसर्डी येथे राजे छत्रपती क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी नांद्र्याचे सरपंच शांताराम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा सीक्सीट बॉलवर खेळविण्यात येत असून, स्पर्धेत एकूण ४० संघानी सहभाग घेतला आहे.
जानकी नगरात अवैध वृक्षतोड
जळगाव - शहरातील जानकी नगरातील डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्या दवाखान्यासमोर निंबाचे युवाअवस्थेतील वृक्ष काही अज्ञातांकडून तोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वृक्षाच्या भोवती पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, तरीही हे वृक्ष तोडण्यात आले आहे. याबाबत संबधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
मास्क न लावणाऱ्या २४ जणांवर कारवाई
जळगाव - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिकांना गांभिर्य दिसून येत नाही. शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी होत असून, नागरिक मास्क देखील लावत नाहीत. शुक्रवारी मनपाच्या पथकाकडून मास्क न लावणाऱ्या २४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
आव्हाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
जळगाव - तालुक्यातील आव्हाणे येथे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, दुसऱ्या टप्प्यात गावात कोरोनाचे नवीन ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत गावात गेल्या १० महिन्यात १८९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.