शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कोणीही आर्थिक गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:32 IST

जिल्हाधिकारी : सातवी आर्थिक गणना जिल्हास्तरीय समितीची बैठक

जळगाव : राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेतून कोणताही मोहल्ला, गल्ली, वस्ती गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची यंत्रणेने दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.

सातवी आर्थिक गणनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह विविध पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचेसह कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.

गणनेचे काम ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा

गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना गणना करणा-या प्रगणकास सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच गावातील संपूर्ण वस्ती गणनेमध्ये समाविष्ठ होण्यासाठी गावातील लोकसंख्या, वार्ड रचना, नव्याने निर्माण झालेल्या वस्त्यांबाबतची माहिती प्रगणकास देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गणना करणारे प्रगणक माहिती घेण्यासाठी आल्यानंतर नागरीकांनीही त्यांना सहकार्य करुन आवश्यक ती माहिती द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे काम सर्वांच्या समन्वयाने ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

१६८८ प्रगणकांची व ५१९ पर्यवेक्षकांची नोंदणी

जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील यांनी जिल्ह्यातील गणनेचे काम पूर्ण करण्यासाठी १६८८ प्रगणकांची व ५१९ पर्यवेक्षकांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली. तसेच जिल्ह्यात ११५३ ग्रामीण व २१९६ शहरी गटांची संख्या असून त्यापैकी ११०३ ग्रामीण तर १५३३ गटांच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. तर ग्रामीण भागात २ व शहरी भागात १६ गटांचे काम सुरु असून अद्याप ग्रामीण भागातील ४८ व शहरी भागातील ६४७ गटांचे काम सुरु झाले नसल्याची माहिती दिली. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जळगाव, भुसावळ, पाचोरा, यावल व रावेर तालुक्याचे गटविकास अधिकारी व फैजपूर व सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आढावा बैठका घेऊन प्रगणकांना गणनेचे काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव