शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे इव्हीएम मशिन पळविल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 18:13 IST

भुसावळ येथील रेल्वे दवाखान्याजवळील नॉर्थ कॉलनी शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४२ बाहेर ईव्हीएम मशिन बदलविण्याच्या संशयावरून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड गर्दी जमा झाली. बुुुथ बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महसूल प्रशासन व पोलीस यांच्या मध्यस्थीने जमाव पांगवला.

ठळक मुद्देनागरिकांनी हरकत घेतल्यानंतर जमा झाला जमावनॉर्थ कॉलनीत काही वेळ निर्माण झाले तणावाचे वातावरणपोलीस व महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने वादावर पडदाझोनल अधिकाऱ्याला प्रांताधिकाऱ्यांनी दिली नोटीस

भुसावळ, जि.जळगाव : येथील रेल्वे दवाखान्याजवळील नॉर्थ कॉलनी शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४२ बाहेर ईव्हीएम मशिन बदलविण्याच्या संशयावरून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड गर्दी जमा झाली. बुुुथ बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महसूल प्रशासन व पोलीस यांच्या मध्यस्थीने जमाव पांगवला. दरम्यान, झोनल अधिकारी आर.एम.महाजन यांना प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी नोटीस बजावली आहे.मतदान केंद्र ४२ येथे झोपन अधिकारी आर.एम.महाजन यांच्या चार चाकी वाहन क्रमांक एमएच-१९-६२२६ मध्ये तीन अतिरिक्त इव्हिएम मशीन हे मतदान केंद्रात न ठेवता बाहेर गाडीत ठेवले होते. मात्र, त्यांना चालकासह जेवणासाठी जायचे असल्याने त्यांनी गाडी क्रमांक एमएच-१९-सीव्ही-२१२७ मध्ये हे मशीन आपल्या मुलाकडे सोपवून सुरक्षित ठेवण्याचे सांगितले. त्यामुळे मुलाने ते मशीन आपल्या गाडीत ठेवण्यासाठी बाहेर काढले. तेव्हा परिसरातील कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातील इव्हीएमच बाहेर काढल्याचा संशय आल्याने गोंधळ उडाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी झोनल अधिकारी महाजन यांना विचारणा केली व इतर कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. त्यामुळे बुथ क्रमांक ४२ वर ईव्हीएम मशीन बदलण्यात येत असल्याची चर्चा परिसरात पसरली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर चांगलीच गर्दी झाली.यातूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी डीवाय.एस. पी. गजानन राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला झालेला प्रकार समजावून सांगितला आणि तणाव कमी केला, तर ईव्हीएम मशीन असलेल्या चार चाकी, झोनल अधिकारी महाजन यांसह तिन्ही मशिन ताब्यात घेतल्या व मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये जमा केल्या आहेत.दरम्यान, प्रांताधिकारी श्रीकुमार चिचकर यांनी झोनल अधिकारी महाजन यांना नोटीस बजावली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकBhusawalभुसावळ