शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांकडील वसुलीस स्थगिती

By admin | Updated: January 7, 2017 00:56 IST

उच्च न्यायालय : स्थगितीच्या स्थितीत दावा ‘रिस्टोअर’

जळगाव : तत्कालीन नगरपालिकेने शहरात राबविलेल्या घरकुलसह मोफत बससेवा व इतर योजनांच्या अंमलबजावणीत पालिकेचे 60 कोटी 32 लाखाचे नुकसान झाल्याप्रकरणी जबाबदार नगरसेवकांकडून वसुलीच्या आदेशांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.  रक्कमेच्या वसुलीसाठी आजी-माजी नगरसेवकांना आता नोटीस बजावण्याची प्रक्रिया बुधवार 4 पासून सुरू केली होती. याबाबत सत्ताधारी खाविआच्यावतीने माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या कार्यवाहीला स्थगिती देत यापूर्वी दिलेला स्थगिती आदेश कायम ठेवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या.घुगे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने पूर्वीच्या स्थगितीच्या स्थितीत दावा ‘रिस्टोअर’ करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील आठवडय़ात पुढील कामकाज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2013 मध्ये तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी 52 नगरसेवकांना घरकुल प्रकरणात 1 कोटी 16 लाखाच्या वसूलीची व मोफत बस सेवा योजनेत सुमारे 5 लाखाच्या जवळपास रकमेच्या वसुलीच्या नोटीस बजावल्या होत्या. या विरूद्ध नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने वसूलीच्या कारवाईस स्थगिती दिली . गेल्या  23 डिसेंबरला ही स्थगिती न्यायालयाने उठवित दावा निकाली काढला होता. प्रशासनाकडून पुन्हा कारवाईस सुरूवात करण्यात आली होती. त्याबाबत खाविआच्यावतीने दावा ‘रिस्टोअर’ करण्याची याचिका खंडपीठा दाखल करण्यात आली. त्यात खाविआच्यावतीने माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. न्यायालयाने दावा रिस्टोअर करण्यासाठी 27 हजार रुपये शुल्क (दंड) आकारावा, पूर्वीच्या स्थगितीच्या स्थितीत रिस्टोअर करण्याचे आदेश दिल्याची माहिती मनपातर्फे काम पाहणारे अॅड.पी.आर.पाटील यांनी दिली. खाविआतर्फे अॅड.शैलेश गंगाखेडकर यांनी काम पाहिले. 4तत्कालीन पालिकेने शहरात गरीबांना मोफत घरकूल देण्याची योजना, मोफत बससेवा, पेव्हर ब्लॉक, विमानतळ या सारख्या विविध योजना राबविल्या होत्या. या योजनांमध्ये अनियमिततेचा आरोप झाल्यानंतर शासनाने दोन समित्या नेमून चौकशी केली होती. या चौकशीत पालिकेच्या 60 कोटी 32 लाखाच्या आर्थिक नुकसानीला पालिकेतील तत्कालीन नगरसेवक  जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता व ही रक्कम संबंधित नगरसेवकांकडून वसूल केली जावी याबाबतचा अहवाल दिला होता.