शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दुचाकी विक्री दालनाचा आरटीओंकडून व्यवसाय परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:20 IST

विक्री केलेल्या वाहनांची वेळेत नोंदणी नाही

ठळक मुद्देनिलंबनाच्या कारवाईविरुद्ध अपील वाहनांची नोंदणी विक्री केल्यानंतर 7 दिवसाच्या आत होणे आवश्यक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22- विना नोंदणी वाहन खरेदीदारास देणे, शासकीय रकमेचा भरणा वेळेवर न करणे आणि नवीन वाहन नोंदणी संबंधित कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर न करणे आदी कारणांमुळे शहरातील प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा.लि. या वाहन वितरक एजन्सीचा व्यवसाय परवाना  उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांनी निलंबित केला.वाहन नोंदणीच्या नियम 47 नुसार नवीन वाहनांची नोंदणी विक्री केल्यानंतर 7 दिवसाच्या आत होणे आवश्यक आहे. वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर वाहन नोंदणीसाठी आरटीओतर्फे  प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा.लि.ला स्वतंत्र युझर आयडी तयार करुन देण्यात आलेला आहे. वारंवार सूचना देऊनही संबंधित एजन्सीकडून नियमांचे पालन झालेले नाही. विना नोंदणी वाहने खरेदीदारांच्या ताब्यात देऊन केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 चे नियम 42 चे उल्लंघन केले. शिवाय 268 प्रकरणात ग्राहकांकडून शासनास भरावयाची रक्कम वसूल करण्यात आली व तिचा भरणा आरटीओ कार्यालयात झालेला नाही, असे नोटीसमध्ये म्हटले होते.   

असे आहेत प्रलंबित प्रकरणे  नोंदणी व कर शुल्कचे 56 प्रकरणे, वाहन तपासणीचे 268, नोंदणी क्रमांक अॅप्रुव्हलचे 125 असे एकुण 449 प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच सरकारच्या रकमेचाही वापर केला जात असल्याने 90 दिवसासाठी व्यवसाय परवाना निलंबित का करु नये अशी नोटीस आरटीओकडून बजावण्यात आली होती. मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिला होता. त्यानुसार वेळेत उत्तर न दिल्याने व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करण्यात आला आहे. 

प्रभंजन ऑटोमोबाईल्सच्या व्यवसाय परवाना निलंबनाच्या कारवाई विरोधात पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अपील केले असल्याचे  प्रभंजन ऑटोमोबाईल्सचे संचालक आदित्य झाखेटे यांनी सांगितले. आपण सर्व पूर्तता केली असल्याचाही दावा त्यांनी केला. परवाना किती दिवसासाठी निलंबित केला आहे, हेदेखील स्पष्ट नसल्याचे जाखेटे यांचे म्हणणे आहे.