शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक फौजदारही निलंबित

By admin | Updated: February 20, 2017 01:29 IST

रात्रीच्या गस्तीत हलगर्जीपणा भोवला : प्रभारी अधिका:यांना बजावली नोटीस

जळगाव : रात्रीच्या गस्तीत गैरहजर राहणे व  कागदोपत्री हजेरी दाखविणे पोलीस कर्मचा:यांना चांगलेच महागात पडले आहे. आधी तीन कर्मचा:यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर रविवारीही औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार प्रकाश अमृत महाजन यांनाही पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी निलंबित केले आहे. दरम्यान, जळगाव शहर, एमआयडीसी व जिल्हा पेठ पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.परिविक्षाधीन आयपीएस अधिकारीमनीष कलवानिया व परिविक्षाधीन उपअधीक्षक डॉ.संतोष गायकवाड हे दोन्ही अधिकारी गेल्या आठवडय़ात रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांना एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे सुनील आनंदा तेली या कर्मचा:याची लॉकअप डय़ुटी असताना ते गैरहजर होते. शहर पोलीस स्टेशनचे उमेश साळुंखे हे नाकाबंदी डय़ुटीत गैरहजर आढळून आले तर जिल्हा पेठचे हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वागळे यांची ठाणे अमलदार म्हणून रिझव्र्ह डय़ुटी होती ते देखील गैरहजर आढळून आले होते.दरम्यान, दोन दिवसापूर्वीही एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार प्रकाश महाजन हे देखील रात्रीच्या गस्तीत गैरहजर आढळून आले. हे सर्व कर्मचारी कागदोपत्री डय़ुटीवर होते. या सर्व कर्मचा:यांचा अहवाल दोन्ही परिविक्षाधीन अधिका:यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे पाठविला होता. सुपेकर यांनी या सर्वाची चौकशी केली, त्यात दोषी आढळल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.शहरात झाडाझडती घेणार रात्रीची गस्त सक्तीची करण्यात आली असताना बरेच कर्मचारी व अधिकारी कागदोपत्रीच डय़ुटी करीत असल्याचे लक्षात आल्याने आता शहरात अचानकपणे झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सुपेकर यांनी सांगितले. तीन पोलीस कर्मचारी व एका सहाय्यक फौजदारास निलंबित करण्यात आले असून प्रभारी अधिका:यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर करणा:या कोणत्याही अधिकारी व कर्मचा:याची यापुढे गय केली जाणार नाही.-डॉ.जालिंदर सुपेकर,          पोलीस अधीक्षकअमळनेरचे निरीक्षक वाघ यांची नव्याने चौकशीअमळनेरचे तत्कालिन निरीक्षक विकास वाघ यांची नव्याने चौकशी केली जात असून त्यात चौकशी अहवाल आल्यावर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई होणार आहे. वेळप्रसंगी निलंबनालाही त्यांना सामोरे जावे लागेल असे संकेत आहेत.