शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील तरुणाचा रेल्वे रुळावर संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 12:19 IST

घातपातचा नातेवाईकांना संशय : डोक्यावर व हातावर जखम

ठळक मुद्देरात्री दीडवाजेर्पयत मित्रांसोबत गप्पा डोक्याला गंभीर जखमकोणाशीही वाद नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 -  शहरातील सिनेमागृहात सिनेमा पाहून घरी आल्यानंतर कपडे बदलवून पुन्हा रात्री घराबाहेर गेलेल्या नरेश राजेंद्र बाविस्कर (वय 19, रा. कांचन नगर) या तरुणाचा शनिवारी सकाळी प्रजापत नगराजवळ रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला. डोक्याला गंभीर जखम व उजवा हातही फ्रॅर झाला आहे, त्यामुळे नरेशचा मृत्यू म्हणजे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश हा शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता सिनेमा पाहण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. सिनेमापाहून आल्यानंतर रात्री बारा वाजता घरी आला. त्यानंतर घरात कपडे बदल केले व नंतर गल्लीत  मित्रांसोबत दीड वाजेर्पयत गप्पा केल्या. यावेळी घरातील सर्व लोक झोपी गेलेले होते. सकाळी  नरेश घरात दिसला नाही व त्याच्या मोबाईलवरही संपर्क होत नसल्याने कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतला असता प्रजापत नगराजवळ भुसावळ मार्गावर रेल्वे खांब क्र.421/1 ते 420/33 दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. नरेश याचा कोणाशीही वाद नाही. तसेच कुटुंबातील सदस्यांचाही वाद अथवा भांडण नाही. तो आत्महत्याही करु शकत नाही, मग रेल्वे रुळाकडे तो गेलाच कसा असा प्रश्न अनेक नातेवाईकांना पडला आहे.