शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

चोर सोडून संन्याशावर संशय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:27 IST

कळमाडू परिसरात मुलांच्या अपहरणाची अफवा : पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

कळमडू, ता. चाळीसगाव येथून जवळ असलेल्या पोहोरा येथे अज्ञातांनी दोन मुलांचे अपहरण करून घेऊन जात असताना त्याना दहिवद येथे पकडल्याची अफवा गावात वाऱ्यासारखी पसरल्याने सोमवारी १० रोजी गावाबाहेर शेकडो ग्रामस्थ जमा झाले होते. त्यातच गावात भिक्षुक साधू फिरत असल्याने त्यांना काही तरूणांनी घेराव घातला होता. मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ९ ते १० साधूंना काही काळ ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आले.पोहोरा येथे आलेल्या दोन साधूंनी दोन मुलांचे अपहरण केल्याची व कळमडू येथूनही मुलाचे अपहरण झाल्याची अफवा गावात सोमवारी वाºयासारखी पसरली. प्रत्येक पालक व महिला आपल्या मुलांचा शोध घेत ग्रामपंचायत कार्यालयात आल्याने एकच गर्दी झाली होती.त्यातच गावात भिक्षुक साधू फिरत असल्याने त्यांच्यावर संशय घेत त्यांना घेराव घालत जमावाने प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. मात्र काही सुज्ञ तरूणांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात फिरणाºया त्या १० साधूंना ग्रामपंचायत कार्यालयात बंद खोली बसवून ठेवले. त्यामुळे विनाकारण केवळ संशयातून ग्रामस्थांचा रोष ओढवण्यापासून साधूंची सुटका झाली.असाच प्रकार दहिवद येथेही घडला. अपहरणाची अफवा पसरल्याने तेथे गावात फिरणाºया दोन साधूंना सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बसवून ठेवले .या घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. सचिन बेद्रे , पोलिस उनिरीक्षक हेमंत शिंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.चौकटपोहोरा, कळमडू व दहिवद येथे मुलांच्या अपहरणाचा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. साधूंच्या वेशातील व्यक्तींनी मुलांचे अपहरण केल्याची अफवा पसरवली जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरविणाºया व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.- सचिन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक, मेहुणबारे