जळगाव : शहर पोलीस स्टेशनचे हवालदार भास्कर ओंकार माळी (वय 50, रा.पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा) यांचा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. माळी यांची भारत नगरच्या पॉईंटवर डय़ुटी लावण्यात आली होती. तेथे अंगाला घाम येऊन छातीत दुखत असल्याने दवाखान्यात जाण्यासाठी तेथून निघाले. कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यावर त्यांना चक्कर आल्याने ते जमिनीवर पडले. हा प्रकार पाहून नागरिकांनी तसेच हवालदार कैलास ठोके यांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविले, मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश माळी यांची 30 वर्षे सेवा झाली होती. वर्षभरापूर्वीच ते शहर पोलीस स्टेशनला रुजू झाले होते. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. संध्याकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह पिंपळगाव हरेश्वर येथे नेण्यात आला. त्यांच्या पश्चात प}ी, एक मुलगी व एक मुलगी आहे.
हवालदाराचा कोर्ट चौकात मृत्यू
By admin | Updated: October 3, 2015 00:51 IST