सोनगीर (धुळे) : पंचायत समिती निवडणुकीसाठी आवश्यक जात प्रमाणपत्राकरिता नंदुरबारकडे जाणा:या दाम्पत्याच्या मोटारसायकलला कंटेनरने दिलेल्या धडकेत कुसुमबाई लक्ष्मण ठाकूर (49) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले.मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने-सरवडच्या दरम्यान मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अंगणवाडी सेविका असलेल्या कुसुमबाई जळगाव जिल्ह्यातील आडगाव गणातून निवडणुकीसाठी इच्छुक होत्या, अशी माहिती मिळाली. अपघातानंतर कुसुमबाई यांना रुग्णवाहिकेने सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जात प्रमाणपत्राची धावपळ महिलेच्या जिवावर बेतली
By admin | Updated: February 1, 2017 00:56 IST