शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मयत रुग्णाचा अहवाल प्राप्त होताच मुक्ताईनगरात तीन हजार नागरिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:07 IST

मयत रुग्णाचा अहवाल प्राप्त होताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने तालुका प्रशासनाची बैठक घेतली.

ठळक मुद्दे आरोग्य विभागाने घेतली बैठकउपाययोजना करण्याच्या आमदारांच्या सूचना

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मयत रुग्णाचा अहवाल प्राप्त होताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने तालुका प्रशासनाची बैठक घेतली. दरम्यान, तीन हजार नागरिकांचे आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले.बैठकीस तहसीलदार श्याम वाडकर, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील, नगरपंचायत सीईओ विक्रम जगदाळे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे उपस्थित होते. यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी वेळ पडली तर वरिष्ठ पातळीवरून मान्यता घेत सीडीआरसारख्या तांत्रिक बाबींचा वापर करण्याचा विषयही चर्चेत आला तर संबंधित भागात तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या.तीन हजार नागरिकांचे सर्वेक्षणज्या भागात कोरोना रुग्ण येऊन गेला त्या भागात तालुका आरोग्य विभागाच्या १० पथकांनी आरोग्य सुपरवायझर अर्जुन काळे विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४०० कुटुंबातील सुमारे तीन हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले. यात एकही ताप किंवा खोकल्याचा रुग्ण मिळून आला नाही, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील यांनी दिली.संबंधित भागात नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी भेट देत या भागात तातडीने निर्जंतुकीकरण केले तर संपर्कातील डॉक्टरचे जुने गाव परिसरातील दवाखाना परिसर बंदिस्त केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर