शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भडगावात आठ हजार घरांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 22:15 IST

साथरोग नियंत्रण : आरोग्य विभागाची मोहीम, स्वच्छता व दक्षतेतून आरोग्य जपण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभडगाव : साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम उघडली असून, आजअखेर आठ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.शहरासह तालुक्यात साथरोगांनी डोके वर काढले आहे. त्यातच शहरात एका विवाहितेसह दोन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच आरोग्य यंत्रणा खळबडून जागी झाली. आरोग्य विभागाने घरोघर सर्वेक्षण सुरू केले आहे. याशिवाय साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. ही मोहीम अजून तीन दिवस सुरू राहणार आहे.आरोग्य विभागाच्या मोहिमेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुचिता आकडे, कजगाव, गुढे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, गिरड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेळके, पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतीक भोसले, डॉ.भाग्यश्री पवार तसेच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींचा समावेश आहे.कोरडा दिवस पाळानागरिकांनी घरोघर पाण्याची टाकी, पाणी साठा हौद आदी आठवड्यातून आलटून-पालटून एक दिवस रिकामा करावा. स्वच्छ करावा. टाकी वा हौद झाकावा. पाणी उकळून गार करून प्यावे. घरा बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. झोपताना मच्छरदाणी वापरावी अशी काही काळजी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.भारत मुक्ती मोर्चाचे निवेदनभडगाव शहरासह ग्रामीण भागात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार होण्यासाठी आरोग्य शिबिर घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी भारत मुक्ती मोर्चाने केली आहे. याबाबतचे निवेदन भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी यांनी तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आदींना दिले आहे.

भडगाव शहरात डेंग्यू संशयित आठ जणांच्या रक्तांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. अजून ७ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.सध्या भडगाव शहरासह तालुक्यात बहुतांश गावांमध्ये साथ रोग आजारांचे प्रमाण वाढले आहे. यात डायरिया, टायफाईड, मलेरिया, डेंग्यू सदृश विविध आजारांचा समावेश आहे.आजही अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यात व भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने शहरासह तालुक्यात या आजारांवर प्रतिबंधात्मक उपचार मोहीम तत्काळ दखल घेत सुरू केलेली आहे.