शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य...पोषण आहाराचा अहवाल निकृष्ट नव्हे उत्कृष्टच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 21:19 IST

भुसावळ तालुक्यातील गोजोरे, कंडारी, मोंढाळे या गावातील जि.प.प्राथमिक शाळेतून जप्त करण्यात आलेल्या पोषण आहाराचा माल हा निकृष्ट नसून उत्कृष्टच असल्याचा अहवाल नाशिक येथील अन्न व औषध तपासणी विभागाकडून देण्यात आला आहे. नुकताच हा अहवाल जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देएफडीएचा अहवाल शिक्षणविभागाला प्राप्त पल्लवी सावकारे जाणार न्यायालयाततीन महिन्यानंतर मिळाला अहवाल

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१३-भुसावळ तालुक्यातील गोजोरे, कंडारी, मोंढाळे या गावातील जि.प.प्राथमिक शाळेतून जप्त करण्यात आलेल्या पोषण आहाराचा माल हा निकृष्ट नसून उत्कृष्टच असल्याचा अहवाल नाशिक येथील अन्न व औषध तपासणी विभागाकडून देण्यात आला आहे. नुकताच हा अहवाल जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. मात्र अन्न व औषध विभागाकडून देखील संबधित पुरवठादाराला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असून, त्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

जुलै महिन्यात जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्या पल्लवी सावकारे, जयपाल बोदडे व माधुरी अत्तरदे यांनी भुसावळ तालुक्यातील तीन ते चार गावांमधील जि.प.प्राथमिक शाळांना भेट दिली होती. संबधित शाळांमध्ये तपासणी केली असता, आहारामध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर जि.प.सदस्यांनी हा माल जमा करून शिक्षणाधिकाºयांकडे जमा केला होता. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा माल तपासणीसाठी नाशिक येथील अन्न व औषध पुरवठा विभागाच्या प्रयोगशाळेत पाठविला होता.

तीन महिन्यानंतर मिळाला अहवालनाशिक येथील प्रयोगशाळेत हा माल तपासणीसाठी जुलै महिन्यात पाठविण्यात आला होता. तब्बल तीन महिन्यानंतर हा अहवाल शिक्षण विभागाला बुधवारी प्राप्त झाला. हा अहवाल ‘नील’ आला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिली. तसेच शिक्षणाधिकाºयांकडून या अहवालाची प्रत मागितली असता. शिक्षण विभागाच्या एका कर्मचाºयाकडे ही प्रत असून, संबधित कर्मचारी आजारी असल्याने त्यांच्याकडून अहवालाची प्रत घेतल्यानंतर शनिवारी ही प्रत दिली जाईल अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

कोट..जि.प.उपाध्यक्ष, संबधित गावांचे सरपंच व माल जप्त करण्यात आलेल्या शाळांचे मुख्याध्यापक यांच्या समोरच पोषण आहाराचा माल फोडल्यानंतर तो माल निकृष्ट आढळून आला होता. मात्र नाशिकहुन आलेला अहवाल चक्क ‘नील’ आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा काही राजकीय व्यक्तींकडून पुरवठादाराचा बचाव करण्यासाठी पुरेपुर वापर केला जात आहे. त्यामुळे त्या विरोधात न्यायालयात जाणार आहे.-पल्लवी सावकारे, जि.प.सदस्या