शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यम...द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थिनीला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अहो आश्चर्यम...अधिक गुण मिळवून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला नव्हे तर द्वितीय ठरलेला विद्यार्थिनीला विद्यापीठाने सुवर्णपदक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अहो आश्चर्यम...अधिक गुण मिळवून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला नव्हे तर द्वितीय ठरलेला विद्यार्थिनीला विद्यापीठाने सुवर्णपदक जाहीर केले असल्याची बाब महाराष्ट्र स्टुडंट संघटनेने समोर आणली आहे. ही चूक संघटनेने विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

विविध अभ्यासक्रम व विषयात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दीक्षान्त समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दीक्षान्त समारंभ ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. मात्र, त्याआधी विद्यापीठाने सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यात विधी अभ्यासक्रमातील लॉ ऑफ क्राईम विषयात १०० पैकी ५९ गुण मिळविणाऱ्या संजना कुकरेजा हिला गुरुवर्य ॲड. अच्युतराव अत्रे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. मात्र, लॉ ऑफ क्राईम या विषयात डिंपल पटेल हिने ६३ गुण मिळविले असून ती प्रथम ठरली असल्याची बाब मासूने समोर आणली आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनालादेखील त्यांनी माहिती दिली असून हा पुरस्कार डिंपल पटेल हिला जाहीर करण्‍यात यावा, अशी मागणी मासूने केली आहे.

कुलगुरूंना दिली माहिती

दरम्यान, हा प्रकार कळताच, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांना महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य संघटक अरुण चव्हाण व प्रदेश सहसचिव दीपक सपकाळे यांनी तत्काळ संपर्क साधून माहिती दिली व ऑनलाईन निवेदनदेखील पाठविले. विद्यापीठाकडून झालेली चूक तत्काळ सुधारून पात्र विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्‍यात आली आहे.

---------------

तांत्रीक चूक होती. ती आम्ही दुरूस्त केली. जिला अधिक गुण आहेत, तिला सुवर्णपदक जाहीर केले आहे. -बी.पी.पाटील, परीक्षा संचालक