शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उद्योग, क्रीडा, पद्म पुरस्कारांसह सर्वच प्रश्नांना सुरेशदादा जैन यांनी दिली अचूक उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:26 IST

जैन महिला मंडळातर्फे ‘कौन बनेगा जिनियस’ स्पर्धेत दादांसह प्राचार्य राणे हॉट सीटवर

ठळक मुद्दे जिंकलेली रक्कम शाळेला7 शाळांची अंतिम फेरीसाठी निवड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - उद्योगजगत असो वा क्रीडा तसेच मिस वर्ल्ड असो वा पद्म पुरस्कार अशा वेगवेगळ्य़ा क्षेत्रातील विचारलेल्या सर्वच प्रश्नांना माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. राणे यांनी हॉटसीटवर बसल्यानंतर अचूक उत्तरे देऊन सर्वाना अवाक् केले.  निमित्त होते जैन महिला मंडळातर्फे एम्को फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित क्वीज कॉन्टेस्ट ‘कौन बनेगा जिनीयस 2017’ स्पर्धेचे. मंगळवारी नियोजन भवनात कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या संकल्पनेवर आधारीत ही स्पर्धा झाली. यात शहरातील 18 शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यातून प्राथमिक पात्रता फेरीतून यातील 7 शाळांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.  स्पर्धेचे उद्घाटन माजी  सुरेशदादा जैन, मंडळाच्या सल्लागार र}ाभाभी जैन, जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस.राणे, शैला मयूर, कमलाबाई अग्रवाल, प्रेमलता डाकलीया, स्वाती पगारिया यांच्याहस्ते दीपप्रज्‍जवालन करून झाले. प्रकल्प प्रमुख नीता जैन यांनी सर्व अतिथींना हॉटसीटवर निमंत्रित केले.

दादा व प्राचार्य राणे यांनी जिंकलेली रक्कम दिली शाळेलाया वेळी सुरेशदादा जैन व प्राचार्य राणे यांना टाटा सन्सचे 2017मधील चेअरमन कोण ?, 2017ची मिस वर्ल्ड कोण?, कसोटी क्रिकेटमध्ये विरेंद्र सहवागनंतर तिहेरी शतक करणारा कोणता भारतीय फलंदाज आहे?, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अॅटोबायोग्राफीचे नाव काय?, पद्मश्री पुरस्कार विजेते तरला दलाल व संजीव कपूर हे कोणत्या क्षेत्रातील योगदानामुळे पद्म पुरस्काराचे मानकरी ठरले?, असे वेगवेगळ्य़ा क्षेत्रातील प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना सुरेशदादा जैन व प्राचार्य राणे या दोघांनी मिळून अचूक उत्तरे दिली. या वेळी त्यांनी जिंकलेली रक्कम मंडळाला दिली व मंडळाने ही रक्कम 17 नंबरच्या शाळेच्या विद्याथ्र्याना दिली. स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल व एस.एल.चौधरी शाळेतील विद्याथ्र्यांनी स्पर्धेतील सर्व फे:या पार करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतील प्रश्नावर खेळ थांबवून सर्वाधिक 4 हजार रुपयांची रक्कम त्यांनी जिंकली. अतिशय रंजकतेने ही स्पर्धा पार पडली. 

सेंट जोसेफ, सेंट टेरेसा, रुस्तमजी, पोदार, आेिरऑन, एस.एल.चौधरी, रायसोनी स्कूल यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे सॉफ्टवेअर तयार करणा:या सुशील राका यांचा सत्कार करण्यात आला. 

येथेही धाकधूकघरी भाभींसमोर बसणे आणि येथे हॉटसीटवर बसल्यानंतर दादा तुम्हाला कसे वाटते ? असा विनोदी प्रश्न मंडळातर्फे सुरेशदादा जैन यांना विचारण्यात आला. त्या वेळी सुरेशदादा म्हणाले, उत्तरे बरोबर देता येतात की नाही, या विचाराने येथेही धाकधूक होती. 

स्पर्धेत तीन प्रश्नांच्या तीन फे:या ठेवण्यात आल्या होत्या. पहिली फेरी पार केल्यावर 700 रुपये, दुसरी फेरी पार केल्यानंतर 2500 तर तिसरी फेकी पार केल्यानंतर  5000 रुपयाचे बक्षीस होते.  मुलांसाठी तज्ज्ञांचे मत, फोन अ फ्रेण्ड, 50/50 आणि प्रश्न बदल करण्याची लाइफ लाइनदेखील देण्यात आल्या होत्या.  विद्याथ्र्याना स्मृतीचिन्ह, पदक आणि रोख रक्कम देण्यात आले.  सूत्रसंचालन दीपा राका यांनी केले.  सचिव मंगला गांधी, स्वाती पगारिया, दीपा राका, कन्या मंडळ अध्यक्षा शिवानी कावडीया, सचिव शिवानी रेदासनी, मीना जैन, मनिषा डाकलिया, अपुर्वा राका, दीप्ती अग्रवाल, अनिता कांकरीया, लता बनवट, स्मिता चोपडा, अंजली चोरडीया, सुलेखा लुंकड, शिल्पा चोरडीया यांचे सहकार्य मिळाले. मनिषा डाकलिया यांनी आभार मानले.