नेरी, ता.जामनेर : गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत ऑर्डरच्या मालाचे जास्तीचे पाईप चोरीच्या उद्देशाने गाडीत भरत असताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. परिणामी जवळपास एक लाख 37 हजार 132 रुपये किमतीच्या पाइपांच्या चोरीचा प्रय} फसला. याप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.27 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास गाडेगाव येथे सुप्रीम कंपनीत ऑर्डरचे पाईप एमएच-19-ङोड-3564 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरण्यात येत होते. यासाठी 100 पाइपांची ऑर्डर होती. नेहमीच्या तुलनेत ट्रकमध्ये 100 पाईप भरण्यासाठी जास्त वेळ लागत आहे, ही बाब या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आली. सुरक्षा रक्षक ट्रकजवळ आले. पाइपांवर नजर फिरवली तर ऑर्डरपेक्षा अधिक पाईप दिसले. पाईप मोजले असता 196 भरले. पाईप चोरीच्या संशयावरून वाहनचालक अश्विन बाबूराव सुरवाडे, रा.पळासखेडा दिगर याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलिसी खाकी पाहताच अश्विनने संपूर्ण कटाची माहिती पोलिसांना सांगितली. यात चंदू काशिनाथ शिंदे, केकतनिंभोरा, रवी नाना पाटील, केकतनिंभोरा, अक्षय सुनील भुसारी, पळासखेडा बुद्रूक, जीवन चिंधू थाटे, माळपिंप्री, गणेश चिंधू पवार, माळपिंप्री, सोनू भावराव बाभळे, माळपिंप्री अशांनी संगनमत करून चोरीचा कट केल्याने कंपनीतील पर्यवेक्षक महेंद्र आनंदा पाटील (रा.शिव कॉलनी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)या प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक नजीर शेख, फौजदार बारकू जाने, हवालदार अनिल सुरवाडे यांनी केली. रात्री 9 वाजेच्या सुमारास कंपनीतून वाहनचालक अश्विन सुरवाडे यास अटक करण्यात आली. नंतर गणेश चिंधू पवार यास रात्री 11 वाजता अटक करण्यात आली.
सुप्रीम कंपनीत चोरीचा प्रय}
By admin | Updated: March 3, 2017 00:32 IST