जळगाव : प.पू. १०८ आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचे परम शिष्य प.पू १०८ श्री सुप्रभसागरजी महाराज व प.पू. १०८ दर्शीतसागरजी महाराज यांचे बुधवार, २७ जानेवारी रोजी जळगावात आगमन होणार आहे.
२६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता धरणगाव येथून ते विहार करणार असून संध्याकाळी चिंचपुरा येथे पोहचून तेथे त्यांचा मुक्काम होणार आहे. २७ रोजी सकाळी चिंचपुरा येथून निघाल्यानंतर जैन इरिगेशन येथे सकाळी १० वाजता आहार होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता तेथून निघाल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजेदरम्यान शिवाजीनगरातील लाल मंदिर येथे आगमन होणार आहे.
मुनीश्रींच्या स्वागतासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री महावीर दिगंबर जीन चैतालय ट्रस्ट व श्री जैन श्राविका महिला मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.