शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सुनील झंवर माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:21 IST

जळगाव : बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले सुनील झंवर हे माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय आहेत. पोलीस यंत्रणा ...

जळगाव : बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले सुनील झंवर हे माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय आहेत. पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.

दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून खान्देशात पाऊस नसल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना झंवर यांच्याविषयी त्यांनी वरील वक्तव्य केले.

कोणी सांगावे, निकटवर्तीय नाही?

बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात मास्टरमाईंड सुनील झंवर याला अटक झाल्यानंतर त्याचे कोणा-कोणाशी संबंध आहेत, कोण निकटवर्तीय आहे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. सोबतच झंवर याच्याकडे काही मंडळींची कागदपत्रेही सापडली. या अटकेनंतर झंवर हे आपले निकटवर्तीय असण्याविषयी गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे. कायद्यानुसार जे होईल ते होणारच आहे. झंवर हे तर सर्वांचेच निकटवर्तीय असून, तसे नसल्यास कोणी सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. यासंदर्भात त्यांनी अधिक बोलणे टाळले.

सरसकट मदत करा

पाऊस नसल्याने जिल्ह्यात दुबार, तिबार पेरण्या करूनही त्या वाया जात आहेत. सर्वच पिके नष्ट झाली असून नदी, नाले, धरणांत पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, जोपर्यंत ढग आहेत, तोपर्यंत कृत्रिम पावसासाठीही प्रयत्न करावा, अशी मागणीही गिरीश महाजन यांनी केली. याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनदेखील दिले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मंत्र्यांचे केवळ दौरे, जिल्हावासीयांची निराशाच

महाविकास आघाडीतील मंत्री निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचे दौरे करीत आहेत. त्यांनी यावे, मात्र जिल्ह्यासाठी काहीतरी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हे मंत्री येऊन निघून जातात, मात्र शेतकरी, सामान्य जनता यांचा विचार करीत नसल्याचा आरोप महाजन यांनी केला. गावा-गावात विजेचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांनाही पुरेशी वीज मिळत नाही. रोहित्र जळाले तर ते मिळत नाही व ऑईलचे कारण सांगितले जाते. इतकी बिकट अवस्था राज्यात कधी नव्हती. अशा परिस्थितीकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाजन यांनी केला.