शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सुनील झंवरने स्विकारले मौनीबाबाचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात सुनील झंवर मास्टरमाईंड असला तरी अटक केल्यापासून आतापर्यंत तपासात त्याने पोलिसांना कोणतेच सहकार्य केले नसून ...

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात सुनील झंवर मास्टरमाईंड असला तरी अटक केल्यापासून आतापर्यंत तपासात त्याने पोलिसांना कोणतेच सहकार्य केले नसून मौनीबाबाचे धोरणच त्याने अवलंबिले आहे. दरम्यान, रविवारी १५ ऑगस्ट रोजी पोलीस त्याला घेऊन नाशिक येथे गेले होते. तेथे दिवसभर चौकशीसत्र राबविल्यानंतर रात्रीच उशिरा त्याला पुण्यात आणण्यात आले. येत्या काही दिवसात त्याला जळगावला देखील आणले जाणार आहे.

पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने झंवर याला १० ऑगस्ट रोजी नाशिक येथून अटक केली. न्यायालयाने त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक येथे तो वारंवार वास्तव्याला होता तसेच या ठिकाणी तो अनेकांना भेटला असून त्याची माहिती घेण्यासाठी पथक त्याला घेऊन गेलेले होते. नातेवाईक तसेच मित्र व ओळखीच्या लोकांकडे तो वास्तव्याला होता तसेच वारंवार राहण्याचे ठिकाणही बदलवित होता. झंवर याच्याकडे महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह इतर राज्यांचा शालेय पोषण आहाराचा ठेका होता. या ठेक्याशी संबंधित ठेकेदार, सब ठेकेदार, वाहन मालक, चालक यांच्या नावावर त्याने बीएचआरच्या पैशांचा व्यवहार केल्याचे समोर आले असून हे सर्वच जण आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. झंवर याच्या घर व कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्र व हार्डडिस्कसह इतर पुराव्यांचे पोलिसांकडून फॉरेन्सिक ऑडीट करायला सुरुवात झालेली आहे. गैरव्यवहारासाठी सॉफ्टवेअर बनविणारा अहमदाबादचा कृणाल कांतीलाल शहा हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. शहा हाती लागल्यावर आणखी मोठे बिंग फुटणार असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. दरम्यान, फिर्यादीत १७ लाख ८ हजार ७४२ रुपयांच्या अपहाराचा उल्लेख नमूद आहे, तर आतापर्यंत तपासात हा आकडा ७२ लाख ५६ हजार २१ हजार १५६ पर्यंत पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा जणांविरुध्द दोन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

आता लक्ष्य गॉडफादर

बीएचआर प्रकरणात मास्टर माईंड, मुख्य सूत्रधार यासह अनेकांना अटक झाली आहे. आमदार चंदूलाल पटेल यांनाही आरोपी करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. त्याशिवाय या सर्वांचा गॉडफादर असलेला बडा मासा पोलिसांच्या रडारवर आहे. त्यादृष्टीने काही पुरावे व कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले असून आणखी सक्षम पुराव्यांचा अभ्यास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोट..

सुनील झंवर याला तपासासाठी नाशिक येथे नेण्यात आले होते. जळगावलाही त्याला आणले जाणार आहे. आतापर्यंतच्या तपासात त्याने काहीच माहिती दिलेली नाही. कोणत्याच प्रश्नावर तो बोलायला तयार नाही. या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.

-भाग्यश्री नवटके, उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे