शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ म्हणून मीच होतो दुनियेतून ऑफ’ असे स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

अयोध्यानगरातील घटना : चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न जळगाव : माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ होतो म्हणून मीच स्वत:च ...

अयोध्यानगरातील घटना : चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

जळगाव : माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ होतो म्हणून मीच स्वत:च दुनियेतून ऑफ होत असल्याचे मोबाइलला स्टेटस ठेवून हर्षल प्रेमनाथ महाजन (वय २९) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी अयोध्यानगरात उघडकीस आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल जैन हा कंपनीत कामाला होता. अयोध्यानगरातील सद्गुरूनगरात तृप्ती कॉर्नरजवळ तो आई-वडील, पत्नी, भाऊ, वहिनी यांच्यासह वास्तव्याला होता. चार महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी पत्नी गायत्री हिच्याशी भांडण झाले, त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. त्या दिवसापासून तो नैराश्येत होता. त्याची पत्नी गरोदर असल्याचे समजते.

रात्री घेतला गळफास

मंगळवारी रात्री आई-वडिलांसोबत जेवण झाल्यावर आई-वडील पुढच्या खोलीत झोपले, तर हर्षल मागच्या खोलीत जाऊन झोपला होता. पहाटे ४.३० वाजता वडील उठले असता हर्षलने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी प्रचंड आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हेमंत कळसकर व चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान, कळसकर यांनी हर्षलचा मोबाइल तपासला असता त्यात स्टेटस ठेवलेले आढळले. सुसाइड नोट वगैरे काही आढळली नाही, त्यामुळे त्याने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. हर्षलच्या पश्चात आई छायाबाई, वडील प्रेमनाथ एकनाथ महाजन, मोठा भाऊ राहुल, वहिनी सुरेखा व पत्नी गायत्री असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकांच्या मनावर अधिराज्य केले

हर्षल याने पहाटे २.२२ वाजता मोबाइलमध्ये स्टेटस ठेवले. त्यात त्याने म्हटले आहे की, माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ झाला; पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. लोकांच्या मनावर अधिराज्य केले. काहींच्या डोक्यात आणि मित्र परिवार छान लाभले. माझे आई-वडील दुनियेतील खूप छान देवमाणूस आहेत. पुढचा जन्म त्यांच्या पोटीच जन्माला येवो ही प्रार्थना देवाला करतो आणि कोणाला मी या गोष्टीला जबाबदार नाही समजत आणि कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो, मला माफ करा, असे स्टेटस त्याने ठेवले अन् गळफास घेतला.