शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

पत्नी माहेरी जाताच रामेश्वर कॉलनीत प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 14:56 IST

रामेश्वर कॉलनीतील महाजन नगरात राहणाºया भागवत पंढरीनाथ वखरे (वय ४५,मुळ रा.रवडा, ता.जामनेर) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. वखरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पत्नी शुक्रवारी सायंकाळी माहेरी गेल्यानंतर वखरे यांनी शनिवारी आत्महत्या केली. दरम्यान, गेल्या आठवड्यातही याच भागात हनुमान नगरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

ठळक मुद्दे शेजारचा मुलगा कटींगसाठी आल्याने उघड झाली घटनाआत्महत्येचे कारण स्पष्ट नाहीयाच भागातील आठवडाभरातील दुसरी घटना 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २१ : रामेश्वर कॉलनीतील महाजन नगरात राहणाºया भागवत पंढरीनाथ वखरे (वय ४५,मुळ रा.रवडा, ता.जामनेर) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. वखरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पत्नी शुक्रवारी सायंकाळी माहेरी गेल्यानंतर वखरे यांनी शनिवारी आत्महत्या केली. दरम्यान, गेल्या आठवड्यातही याच भागात हनुमान नगरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, भागवत वखरे हे पत्नी ज्योती, मुलगा सचिन (वय १७) व मुलगी मयुरी (वय १४) असे महाजन नगरात एकत्र राहत होते तर भाऊ देविदास, वडील पंढरीनाथ संतोष वखरे,आई इंदूबाई असे शेजारीच राहायला होते. भागवत वखरे हे बांधकामाच्या ठिकाणी मजुरी तर कधी सलून काम करायचे. पत्नी ज्योती व मुलगी मयुरी शुक्रवारीच सायंकाळी माहेरी (तुकारामवाडी, जळगाव) येथे गेली होती तर मुलगा सचिन व भागवत हे दोन्ही बाप-बेटे घरी होते. मुलगा सकाळी ९ वाजताच आईकडे जाण्यासाठी निघाला होता.

शेजारचा मुलगा कटींगसाठी आल्याने उघड झाली घटनाभागवत वखरे हे सलूनचे काम करीत असल्याने शेजारचा मुलगा त्यांच्याकडे कटींग करण्यासाठी आला होता. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने कोणीही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून हा मुलगा परत आला व दरवाजा कोणीच उघडत नसल्याचे आईला सांगितले. त्यानुसार त्या मुलाची आई वखरे यांच्या घरी गेली असता आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी लाकडी फडीतून डोकावून पाहिले असता भागवत यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती शेजारच्यांना सांगितली असता लोकांनी धाव घेऊन दरवाजा तोडला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.