नंदुरबार : विवाहितेने सव्वा वर्षाच्या मुलीसह स्वत:ला जाळून घेतल्याची खळबळजनक घटना नंदुरबारातील बाहेरपुरा भागात रविवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. बाहेरपुरा भागातील नवजीवन चौकात राहणारी सुवर्णा रामकृष्ण मराठे (24) व रुचिता रामकृष्ण मराठे (वय 15 महिने) अशी मृतांची नावे आहेत. सकाळी विवाहितेने राहत्या घराच्या दुस:या मजल्यावर मुलीसह अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले. या वेळी विवाहितेने आतून कडी लावून घेतली होती. याबाबत जगदीश यशवंत माने यांच्या खबरीवरून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विवाहितेने आरडाओरड केल्याने कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी दोघींना विझविण्याचा प्रय} केला; परंतु दोघी गंभीर भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विवाहितेची चिमुकलीसह जाळून घेऊन आत्महत्या
By admin | Updated: October 19, 2015 00:07 IST