शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘गोर्इंग टू लाँग जर्नी’ स्टेटस ठेवत केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 17:53 IST

पहूरला युवकाने घेतला गळफास: कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही, गावात हळहळ

पहूर, ता. जामनेर : पेठ मधील रहिवासी राहूल समाधान चौधरी (२०) या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्घटना गुरवारी सकाळी घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्ये पूर्वी त्याने ‘गोर्इंग टू लाँग जर्नी’ असे स्टेटस  त्याच्या मोबाईलवर ठेवले होते.या घटनेमागील कारण समजू शकले नसून ही घटना घडली त्यादरम्यान घरात त्याचे वडील समाधान पाटील व लहान भाऊ समोरील खोलीत टि.व्ही पहात होते. आई शेतात गेली होती.यादरम्यान राहूलने आजीकडे सुपारी खाण्याची इच्छा व्यक्त केली. आजी सुपारी घेण्यासाठी बाहेर गेल्या. त्यावेळेत मागील खोलीत जावून राहूलने गळफास लावून आत्महत्या केली. याचा आवाज समोरच्या खोलीत बसलेल्या वडिलांना व भावाला आला. लगेच ते धावत आले. ते दृष्य पाहून घटनास्थळी आराडाओरड झाल्याने आजुबाजूचे लोकही जमले.लगेचच संजय पाटील, समाधान चौधरी ,लहान भाऊ व रहिवाशांनी ग्रामीण रुग्णालयात राहूलला दाखल केले. मात्र वेळ निघून गेली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केल्याने वडील ,आजी लहान भाऊ यांनी हंबरडा फोडला.सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला.दरम्यान या युवकाने आत्महत्या का केली असावी? हे गुढ असून याप्रकारणी प्रकाश शेनफडू पांढरे यांच्या फिर्यादीवरुन पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेपूर्वी मोबाईलवर ठेवला स्टेटसराहूलने आत्महत्या करण्याच्या पंधरा ते विस मिनिटांपूर्वी ‘गोइंग टू लाँग जर्नी’ असे स्टेटस ठेवल्याचे मित्रांनी रुग्णालयात सांगितले. राहूल सोज्वळ, शांत व गुणी मुलगा असल्याचे सांगितले. अवघ्या पंधरा मिनिटात होत्याचे नव्हते झाले. आणि राहूल अगदी दूरच्या प्रवासाला निघून गेला. काही वेळात घटनेची वार्ता गावात पसरली. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.