शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

जामेनर तालुक्यात १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली होती. अक्षय गोविंदा चोपडे ...

जामेनर तालुक्यात १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली होती. अक्षय गोविंदा चोपडे व ऋषीकेश नारायण कोळी हे दोन तरुण पीडितेला दोन महिन्यापासून चिडवत होते, सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. तपासात दोघं जण तिच्या घराजवळ जाऊन चिडवत होते तर पीडिता हिने लाल शाईच्या पेनने वहीच्या पानावर ऋषीकेश हे नाव मराठीत तर ‘आय लव्ह यू’ असे इंग्रजीत लिहिले होते. त्यातही खाली ‘ऋषीकेश तुला माहीत नसले मी तुझ्यावर किती प्रेम करते अन‌् तुने जर मला विसरायची कोशिश केली तर..असे मराठीत लिहिलेले होते.

संशयिताची वैद्यकीय तपासणी होणार

मुलीने आत्महत्या केल्यानंतर अक्षय व ऋषीकेश या दोघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार अक्षय याला ८ रोजी ११ वाजता तर ऋषीकेश याला बुधवारी दुपारी दोन वाजता अटक करण्यात आली. तपासाधिकारी राजेश काळे यांनी दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील भारती खडसे यांनी पीडितेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून चौकशीसाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर दोघांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, शवविच्छेदन करताना पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यामुळे अटकेतील दोघांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून तेव्हाच नेमके कोणी शारीरिक संबंध केले हे स्पष्ट होणार आहे.