येथे ८ मार्चपासून कोरोना या जीवघेण्या आजाराविरोधात लसीकरण सुरू आहे. १६ जूनपर्यंत ४३५७ एवढ्या लोकांचे लसीकरण झाले असून त्यात एकाही आदिवासी बांधवाने लस घेतल्याची नोंद नाही. नेमका याबाबत विचार करून येथील आरोग्य सेविका शोभा पाटील यांनी उमरे येथील आशा सेविकेशी संपर्क करून गावातील आदिवासींना लस घेण्यासाठी पाठवण्याचे कळवले, परंतु मजुरीचा व्यवसाय, कासोदा येथे येण्यासाठी भाड्याला पैसे नाहीत व भीती अशा अनेक कारणांमुळे ते येत नाहीत, असे सांगितले, या अडचणी वैद्यकीय अधिकारी यांना कळवून त्यांनी आदिवासी वस्तीत लसीकरणासाठी परवानगी मिळवली.
तेथे गेल्यानंतर ईश्वर पाटील, दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्या सपना संजय भिल्ल, माजी सरपंच संजय उत्तम सोनवणे, प्रा.शि.सचिन हेडिंगे आशा सेविका छायाबाई पाटील, सुवर्णाबाई पाटील, यांचे मदतीने या समाज बांधवात विश्वास निर्माण करून गैरसमज काढले, एकाला लस टोचल्यावर काही ही त्रास न झाल्याने त्यानेच ‘सूई तं टूच बी नां, टोची ल्या समदा जन’ असे आवाहन सर्व समाजाला केले व सर्वांना लसीकरणासाठी घेऊन आला, नंतर उमरे व मालखेडा या दोन्ही खेड्यातील सर्व ५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
तळमळीने आदिवासी बांधवांचे वस्तीवर जाऊन लसीकरण करून घेतल्याने कासोदा प्रा.आ. कर्मचाऱ्याचे तसेच उमरे येथील सचिन पाटील व अशा सेविकांचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख व स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
===Photopath===
180621\img-20210616-wa0237~2.jpg
===Caption===
कासोदा-येथील आरोग्य सेविका शोभा पाटील आदिवासी वस्तीत लसीकरण करुन घेतांना